Take a fresh look at your lifestyle.

अॅड.राहुल झावरे : निलेश लंके प्रतिष्ठानचा ‘आत्मा’ !

नेटाने किल्ला लढविणाऱ्या शिलेदाराचा आज वाढदिवस.

 

✒️ नाना करंजुले

पारनेर : फळाची अपेक्षा न करता परिश्रम आणि मेहनत करीत राहण हे कर्तुत्ववान व्यक्तीचे लक्षण आहे. त्याच्या कार्याची एक ना एक दिवस दखल घेतली जाते याचा प्रत्येय पारनेरकरांना आला. आमदार निलेश लंके यांच्या खांद्याला खांदा लावून वेळप्रसंगी तोफेच्या तोंडी जाऊन विरोधकांचे हल्ले अडवणाऱ्या व त्यांच्यावर प्रतिहल्ले चढवणाऱ्या अ‍ॅड. राहूल झावरे यांच्याकडे कृषी विभागाच्या आत्मा कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.निलेश लंके प्रतिष्ठानचे राज्य सचिव असलेले  अ‍ॅड. झावरे खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानचे आत्मा मानले जातात.

आमदार निलेश लंके यांना अनेक निष्ठावंत सहकारी आहेत. त्यांचा शब्द प्रमाण मानून काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तरुण कार्यकर्त्यांची पारनेर  नगरच्या आमदारांकडे मोठी फळी आहे. कोणताही स्वार्थ न ठेवता काम करणारे तरुण तुर्क हे खऱ्या अर्थाने आ.लंके यांची खरी ताकद आहे.24 तास 365 दिवस काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या पाठीमागे मोठी यंत्रणा आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या सोबत आहे. स्वतःला झोकून देणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. त्याच्यामुळे पारनेर- नगरचे नाव जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. आमदार निलेश लंके यांच्याबरोबर सावलीप्रमाणे राहणारे, त्याचबरोबर विरोधकांचे हल्ले स्वतःच्या छातीवर छेलून कोणत्याही परिणामाची पर्वा न करता समोरच्या प्रतिहल्ला करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून अ‍ॅड.राहुल झावरे यांच्याकडे पाहिले जाते. निलेश लंके प्रतिष्ठानचे ते राज्य सचिव आहेत.

निलेश लंके यांना शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदावरून पाय उतार व्हावे लागले त्याचबरोबर त्यांना पक्षातूनही बाजूला करण्यात आले. त्यावेळी अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामध्ये

अ‍ॅड.राहुल झावरे यांचा समावेश होता. त्यांनी आत्मा समितीसह युवा सेना तालुका अधिकारी पदावर पाणी सोडत आ.लंके यांची साथ केली. निलेश लंके प्रतिष्ठानच्या स्थापनेमध्ये सुद्धा त्यांनी मोलाचा वाटा उचलला. विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रचाराचे सारथ्य केले. आपले नेतृत्व विधानसभेत जाण्याच्या दृष्टिकोनातून रात्रीचा दिवस केला, पायाला भिंगरी लावून प्रचार केला. सर्वांप्रमाणे त्यांनी ही परिश्रम घेतले. लोकनेते निलेश लंके आमदार झाल्यानंतरही अ‍ॅड.राहुल झावरे यांनी अत्यंत नेटाने किल्ला लढवला.

कोरोना वैश्विक संकटाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांच्यासोबत अनेक जबाबदाऱ्या खांद्यावर घेतल्या अर्थात इतर सहकारी सुद्धा त्यांच्या सोबत होते. ते पेशाने वकील आहेतच या व्यतिरिक्त कृषी क्षेत्रातही त्यांना कमालीचा रस आणि आवड आहे.  पारनेर येथे भरवण्यात आलेले  कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रयत्न केले. या सर्व दृष्टिकोनातून विचार करून अ‍ॅड.राहुल झावरे यांच्या वर कृषी विभागाच्या आत्मा समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.

[wp-embedder-pack width=”100%” height=”400px” download=”all” download-text=”” attachment_id=”154″ /]