Take a fresh look at your lifestyle.

हवामान अभ्यासक पंजाबराव डख आहे तरी कोण? 

'त्यांचे' पावसाचे अंदाज ठरतात अगदी अचूक.

 

बळीराजाची पावसाचा अंदाज सर्व काही असतो. कारण पीक नियोजनाचं भवितव्य या अंदाजावर ठरत असतं. असे असले तरी हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज जुळत नसल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडते. मात्र, सध्या हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवलेले हवामानाचे अंदाज अचूक ठरत असल्याने त्याचा सर्वत्र डंका आहे.
पाऊस कधी व किती पडणार? याबाबत डख यांचा अंदाज शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतोय. त्यामुळे शेतकरी म्हणतात, एकवेळ हवामान विभाग चुकेलं पण पंजाबराव डख नाहीत. चला, तर आज जाणून घेऊयात पंजाबराव डख आहे तरी कोण?
पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील रहिवासी आहे. पेशाने अंशकालीन शिक्षक असलेले डख महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून हवामानाचा अंदाज वर्तवत असतात.
डख हे सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. लहानपणापासून जिज्ञासू स्वभाव असणारे डंख टिव्हीवरील इंग्रजी व हिंदी बातम्या वडिलांबरोबर पाहताना हवामानाच्या अंदाजावर सातत्याने चर्चा करत. पुढे हवामान विषयात त्यांची आवड निर्माण झाल्याने त्यांनी तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या. सी-डॅक (C-DAC) हा संगणक संबंधित अभ्यास पूर्ण केल्याने त्यांना उपग्रह, अवकाश याविषयीचे बारकावे समजून घेता आले. हळू-हळू त्यांना अंदाज व्यक्त करण्याची आवड लागली. आज ते आपल्या घरात बसून संपूर्ण महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज लावण्याची किमया साधतात.
दरवर्षी डख आपला वार्षिक अंदाज जाहीर करतात. शेतकऱ्यांना वार्षिक पीक नियोजन सोयीचे ठरावे हाच उद्देश ठेवून ते शेतकऱ्यांपर्यंत हवामाच्या अंदाजाची माहिती पोहचवतात. डख यांनी हवामान अंदाज वर्तविण्याचे मॉड्यूल विकसित केलेय. तंत्रज्ञानासोबतच काही नैसर्गिक घटकांचा देखील त्यामध्ये अंतर्भाव आहे.