Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून सैनिक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलली !

चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला खुलासा.

 

पारनेर : तालुका सैनिक सहकारी बँकेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार ( दि. ३०) रोजी आयोजीत करण्यात आली होती. राज्य शासनाने दि. २३ मार्च २०२१ रोजीचे परीपत्रकान्वये वार्षीक सभा घेण्याची मुदत ३१ डिसेंबर २०२१ दिली होती त्या नुसार बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी होणार होती परंतू महाराष्ट्र शासनाचे दि. ३ सप्टेंबर २०२१ रोजीचे परीपत्रकानुसार सहकारी संस्थाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा या दि. ३० सप्टेंबर २०२१ पूर्वीच घेण्यात याव्यात असे नमुद केलेले होते. त्यामुळे बँकेने दि. १६ सप्टेंबर २०२१ रोजीचे वर्तमानपत्रामध्ये दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी बँकेची वार्षिक सभा असले बाबत नोटीस प्रसिध्द केली होती. परंतू पून्हा महाराष्ट्र शासनाने दि. २२ जानेवारी २०२१ रोजीचे मंत्रीमंडळ बैठकीमध्ये परत राज्यातील सर्व सहकारी संस्थाचे लेखापरीक्षण करणेसाठी दि. ३१ डिसेंबर २०२१ व वार्षिक सर्वसाधारण सभा घेणेसाठी दि. ३१ मार्च २०२२ रोजी पर्यंतची मुदत वाढ दिलेली आहे.
तसेच लेखापरीक्षण अहवाल सुध्दा अदयाप बँकेस प्राप्त झालेला नाही त्यामुळे सदरची सभा रद्द करण्याचा निर्णय बँकेचे संचालक मंडळाने घेतलेला आहे. परंतू बँकेचे सभासद बाळासाहेब नरसाळे व विनायक गोस्वामी यांचे तकारीमुळे वार्षिक सभा रद्द झाली अशा बातम्या सोशल मीडिया व वर्तमानपत्राच्या पसरवून बँकेची बदनामी करत आहे त्यामुळे तक्रारदारांचे तक्रार अर्जामुळे सभा रद्द झाली असा गैरसमज कुणीही करून घेऊ नये व बँकेबाबत कोणत्याही चुकीच्या अफवा सोशल मिडीया मध्ये किंवा बँकेचे सभासद, खातेदार याच मध्ये पसरवू नये अशी माहीती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये नमुद केले आहे.
बँकेची दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजीची नियोजीत सभा ही नियमाप्रमाणेच होती ती नियमबाहय कधीच नव्हती. केवळ शासनाने दि. ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी वार्षिक सभा घेण्यात याव्यात असे सुचविल्यामुळे बँकेची सभा दि. ३० सप्टेंबर २०२१ रोजी ठेवली होती परंतू शासनाने राज्यातील सर्व सहकारी संस्थांना वार्षिक सभा घेण्यासाठी मुदत वाढ दिल्यामुळे व बँकेस मागील आर्थीक वर्षाचा ऑडीट रिपोर्ट प्राप्त न झाल्यामुळेच संचालक मंडळाने सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे सदरचा निर्णय सभासद श्री नरसाळे व गोस्वामी यांच्या तकारीमुळे घेतलेला नाही त्यामुळे वार्षीक सभा तक्रार अर्जामुळे रद्द करण्याची नामुष्की बँकेचे संचालक मंडळावर आली अशा स्वरूपाच्या बढाया मारून कोणत्याही प्रकारचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे माहीती बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे यांनी सांगितली.
माजी सैनिकांनी या बँकेची स्थापना केली असे त्यांनी दिलेल्या बातमीमध्ये म्हटले आहे मग सभासद गोस्वामी यांनी संचालक मंडळ निवडणूकीमध्ये मतदानाचा व उमेदवारी करण्याचा अधिकार फक्त माजी सैनिकांना न ठेवता त्याविरोधात त्यांनी स्वतः सहकार खात्याकडे तकार करून माजी सैनिक सोडून इतर (सिव्हीलीयन) सभासदांनाही मतदान व संचालक मंडळ निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार का मागितला असा सवाल चेअरमन व्यवहारे यांनी केला आहे.