Take a fresh look at your lifestyle.

पारनेर ग्रामीण पतसंस्थेला १ कोटी ८५ लाखांचा नफा !

अध्यक्ष काशिनाथ दाते यांची माहिती.

 

पारनेर : पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेला मागील आर्थिक वर्षात १ कोटी ८५ लक्ष रुपये निव्वळ नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ दाते सर यांनी दिली.
पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा बुधवारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाईन पार पडली. या वेळी दाते म्हणाले, संस्थेकडे मार्च २०२१ अखेर १४२ कोटी ८२ लाख रुपयांच्या ठेवी असून, संस्थेच्या ठेवींमध्ये मागील आर्थिक वर्षात १७ कोटी ९८ लाख रुपये वाढ झाली आहे. संस्थेने सभासदांना मार्च २०२१ अखेर १२४ कोटी ४४ लाख रुपये कर्ज वितरण केले आहे.
संस्थेला मागील आर्थिक वर्षात १ कोटी ८५ लक्ष रुपये निव्वळ नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. संस्थेच्या १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे ५ हजार ८८६ सभासद आहेत. संस्थेने विविध बँकांमध्ये ४१ कोटी ६१ लाख रुपये गुंतवणूक केलेली असून, संस्थेकडे १७७ कोटी ६७ लाख रुपये खेळते भांडवल आहे. ग्राहकांना आरटीजीएस सुविधा, कोर बँकिंग सुविधा तसेच ‘अ’ वर्ग सभासदांचा १ लाखाचा विमा उतरविण्यात आला आहे.
संस्थेचे संचालक रखमाजी कापसे सर यांनी सर्व ऑनलाईन उपस्थित सभासदांचे आभार मानले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात यांनी प्रोसिडिंग वाचन केले. या वेळी व्हा. चेअरमन बाळासाहेब सोबले, लक्ष्मण डेरे, रामदास दाते, शिवाजी काळे, मयूर गांधी, अर्जुन गाजरे, राजेंद्र औटी, सुभाष राठोड, कृष्णा उमाप, सुनील गाडगे तसेच सुरेश बोरुडे व मुख्य कार्यालयातील कर्मचारी व सभासद ऑनलाईन उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे संचालक रखमाजी कापसे यांनी केले.