Take a fresh look at your lifestyle.

अबब ! मनोहरमामाच्या अकाउंटमध्ये 44 लाख !

पैसे आले कोठुन ? पोलिस तपास सुरू.

0

 

 

करमाळा : बलात्कार प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर भोसलेकडे मोठ्या प्रमाणावर पैसे कोठून यायचे? याचा तपास पोलीस करत आहेत. भोसले चे सध्याचे बँक अकाउंट देखील पोलिसांनी सील केले असून एका खात्यामध्ये 44 लाख रुपयांची रक्कम असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
उंदरगाव येथील आश्रमात येणाऱ्या भक्तांकडून मनोहर भोसले याचे समर्थक जे पैसे गोळा करायचे, त्या पैशाचा विनियोग कोठे केले जात होता? याची माहिती देखील पोलिस घेत आहेत. मनोहर मामाला करमाळा पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला खोकल्याचा त्रास वाढल्याने पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.
मात्र बलात्काराच्या प्रकरणातील तपासणी अजून पूर्ण व्हायची असल्याने दवाखान्यातील उपचार संपल्यानंतर मनोहर भोसलेला पुन्हा पोलिस कोठडी दिली आहे. या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीमध्ये पोलिसांना बलात्कार प्रकरणासह त्यांच्या आश्रमात जमा होणाऱ्या रकमेसंदर्भात तपास करावयाचा आहे. एक ऑक्टोबर पर्यंत मनोहर भोसलेला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.