Take a fresh look at your lifestyle.

बोलण्यात सामर्थ्य आहे !

याहुन धारदार हत्यार नाही.

 

चौऱ्यांशी लक्ष जीव योनीत मनुष्य श्रेष्ठ आहे.कारण त्याला व्यक्त होण्यासाठी बोलण्याचं सामर्थ्य लाभलं आहे. तसा प्रत्येक प्राणी न बोलता आपल्या भावना व्यक्त करीत असतो.पण नेमकं काय म्हणायचय हे बोलण्याशिवाय अधुरं आहे. आनंद,क्रोध,भिती,संकोच,नाराजी या भावना मनुष्याखेरीज चांगल्या पद्धतीने कुणीही मांडु शकत नाही.प्राणी जिभेने अंग चाटुन,भोवती घोटाळुन प्रेम व्यक्त करतात त्यांना राग आला तर ते हल्ला करतात.कारण बोलण्याचं सामर्थ्य नाही.
आपण मोठे भाग्यवान आहोत.आपण बोलण्याबरोबरच लिहुनही व्यक्त होऊ शकतो.न बोलताही लेखनीतुन बोलु शकतो.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
तुकोबाराय म्हणतात,बोलणे ते आम्ही बोलो उपयोगी।पडिले प्रसंगी काळाऐसे।। आमचं बोलणं वायफळ आणि वायफट असता कामा नये.आम्ही बोललो तर ते उपयोगीच असलं पाहिजे. शिवाय ते काळप्रसंगाला अनुरूप असलं पाहिजे. स्वार्थ डोक्यात ठेऊन केलेलं बोलणं म्हणजे वायफळ आणि दुःख देणारं असतं.स्वतःला आनंद देणारं भाष्य करताना दुसऱ्याचा विचार करुन बोललं पाहिजे.चारसहा स्रिया एकत्र जमल्या आणि गप्पा सुरू झाल्या.एक स्री म्हणाली वांझोटं जगण्यापेक्षा मेलेलं बरं.त्यात एका स्रीला मुलबाळ नव्हते.तिच्या मनाला त्या बोलण्याने प्रचंड यातना झाल्या.आपल्या सहज बोलण्याने काय होईल,याचा विचार त्या स्रीने बोलताना केला नाही. कारण जे मला मिळालं आहे त्याचा उन्माद मनुष्यातच पहायला मिळतो.वास्तविक मुल होण न होणं हे शारीरिक स्थितीवर अवलंबून आहे. काही एखाद्याला शारिरीक दोषाने येणाऱ्या भोगाला आपण आनंदाचं साधन कसं करु शकतो?
आपल्या सहज बोलण्यात आणि संतांच्या सहज बोलण्यात हाच फरक आहे.
तुकोबाराय म्हणतात,सहज बोलणे हितोपदेश।करुनि सायास शिकविती।। संतांचं सहज बोलणं हे हितकारक आहे. त्याने मनुष्याचा उद्धार होतो तर आपल्या सहज बोलण्यातून आपण एखाद्याच्या कुळाचा उद्धार करतो.कळतय ना!मला काय म्हणायचं आहे ते? नुसत्या शब्दाने वस्रहरण करण्याचं कसब आम्हा सर्वांना प्राप्त झालेलं आहे. पण असं बोलणं जे स्वतःला आनंद देईल आणि दुसऱ्याला दुःख ते आनंदात मोडतच नाही. हेच जर दुसऱ्याने आपल्याबरोबर केले तर मग तिळपापड होतो,सहन होत नाही, चडफड होते. महाराज म्हणतात, बोला तर हरी बोला।नाहीतर अबोला।। म्हणजे बोलाल तर चांगलच बोला अन्यथा न बोललेलं बरं. आपण अनेकदा गरज नसताना बोलतो आणि संकट निर्माण होते.झोंबणारं वक्तव्य असेल तर समोरचा त्याचं उत्तर त्याच्या शक्तीने तो देतो.त्याचे परिणाम गंभीरही असु शकतात. असं असलं तरीही बोलल्याशिवाय रहावत नाही, चैनच पडत नाही हे त्याचं उत्तर आहे.
माझे गुरुदेव म्हणतात, मिळालेलं जीवन आनंदात घालवायचं असेल तर प्रेमाणे बोला.प्रत्येक युगात अवतारी महापुरुष,देवदेवता सोबत हत्यार घेऊन आलेले आहेत.परशुराम कुऱ्हाड घेऊन आले,भगवान श्रीकृष्ण सुदर्शन चक्र घेऊन आले,प्रभु श्रीराम धनुष्यबान घेऊन आले कारण अविचाराचं साम्राज्य होतं.बोलून भागणार नाही वाईट शक्तिचा निप्पात करणं गरजेचं होतं.त्या काळाची ती गरज होती.आपण कलियुगात आहोत.संतांनी अवतार कार्य केले.तुकोबांची श्रीमंती अफाट होती.त्याचा त्याग करुन ते म्हणाले,सकळांचे पायी माझे दंडवत। तुकोबाराय अगदी दंडवत घालून हिताच्या गोष्टी सांगतात. त्यामुळे ते संतत्वाला प्राप्त झाले.कलियुगात दोन हाताचा नमस्कार हेच शास्रानं दिलेलं शस्त्र आहे.राजकुमार सिद्धार्थाने नगरातुन फेरफटका मारताना जन्म,जरा आणि मृत्यू पाहिला आणि राजवैभवाचा त्याग केला.४९वर्षे ध्यानसाधना केली आणि ते बुद्धत्वाला प्राप्त झाले.विपश्यना हे शांतीचं शस्त्र जगाला अर्पण केलं.
आम्हा प्रापंचिकांना कोणतही त्यागाचं दिव्य करायचं नाही. संतत्वालाही प्राप्त व्हायचं नाही.फक्त तोंडाचं गटार होऊ द्यायचं नाही एवढं ठरवलं तरी मनुष्य जन्माचा आनंद संपणार नाही. आपण नक्की प्रयत्न करत राहु.
रामकृष्णहरी