Take a fresh look at your lifestyle.

गोड खाण्याची सवय सोडायची असेल तर ‘हे’ उपाय करा…!

तुमच्या आरोग्यासाठी हे कराच !

आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर गोड खाल्ल्याशिवाय जमत नाही. मात्र अशा पद्धतीने साखर खाणे आरोग्यासाठी नक्कीच घातक आहे. हा सगळा विचार करता खालील काही साध्या सोप्या खाण्याच्या सवयी तुमच्यासाठी आवश्यक आहेत…
1. नाश्त्यामध्ये प्रोटीन वाढवा – एका अभ्यासातून असे समोर आले आहे की, नाश्त्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढवल्याने साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा थोडी कमी होते. म्हणून तुमच्या नाश्त्यात अंडे, कडधान्ये, शेंगा, दही आणि ताजी फळे यां सारख्या गोष्टींचा समावेश करा.
2. चहा प्या – चॉकलेट किंवा मिठाई खाण्याची इच्छा झाली की, एक कप चहा घेऊ शकता. मात्र यात साखरेचे प्रमाण कमी असेल याची काळजी घ्या. एक कप चहा पिल्यास तुमची साखरयुक्त पदार्थ खाण्याची इच्छा कमी होईल.
3. झोपून घ्या – हे वाचून तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. पण हा गोड खाण्याची इच्छा कमी करण्याचा एक चांगला उपाय आहे. जेव्हा तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल तेव्हा, थोडा वेळ झोप काढा.
4. पालक – जर तुम्हाला गोड खाणे कमी करुन वजन नियंत्रित करायचे असेल तर पालक अतिशय उपयोगी आहे. कारण पालकमध्ये असलेल्या थायक्लॉईड्समुळे गोड खाण्याची इच्छा आपोआप कमी होते.
5. जाहिराती, चित्रे न्याहाळू नका – गोड खाण्यामागे हे सुद्धा एक मोठे कारण आहे. अनेकदा आपण आपल्या तोंडाएवजी डोळ्यांनीच खात असतो. यामागे मोठे कारण आहे ते म्हणजे जाहिराती. खाण्याच्या जाहीराती जेवढे पाहत बसाल तेवढेच ते खाण्याची इच्छाही तीव्र होते. यामुळे अशा जाहिराती, चित्रे न्याहाळण्याचे टाळा.