Take a fresh look at your lifestyle.

‘गुलाब’ नंतर आता राज्याला ‘शाहीन’ चक्रीवादळाचा धोका ! 

अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता.

 

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘गुलाब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडतोय. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे वादळ असता निवळले असून त्याचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. त्याचमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असून विदर्भासहीत अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडतोय.
पुढील २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार तसेच अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. फक्त एवढेच नाही तर ‘गुलाब’ चक्रवादळ आता नव्याने अरबी समुद्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता असून त्याचे नाव ‘शाहीन’ असे असणार आहे. हे नाव ओमानने दिलेले आहे. या वादळाच्या निर्मितीसंदर्भात पुढील काही दिवस फार महत्वाचे ठरणार असल्याचे सांगितल्या जात आहे.
दरम्यान, राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार व अतीवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, ठाणे विदर्भात प्रभाव कमी असणार असून बुधवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात याचा प्रभाव राहिल अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.