Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸29 सप्टेंबर 2021 

 

▪️मेष : आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. या मार्गावर काही अडचणी येतील. काही मुद्दे समस्येत भर घालू शकतात.
▪️वृषभ : दिवस आनंदात घालवावा. मुलांच्या भविष्याची चिंता वाटेल. काही वेळ स्वत:साठी ठेवावा. व्यायामाचा कंटाळा करू नका.
▪️मिथुन : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहा. चांगल्या गोष्टींचा अनुभव घ्याल.
▪️कर्क : उत्तम संधी ओळखा. काही व्यावसायिक निर्णय घ्यावे लागू शकतात. व्यापारी वर्गाने गाफिल राहू नये.  
▪️सिंह : कोर्टाच्या कामात दिवस जाईल. अथक श्रमाचा थकवा जाणवेल. काही कामे लांबणीवर पडण्याची शक्यता.
▪️कन्या : कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण राहील. मात्र वादापासून दूर राहावे. योग्य ठिकाणीच पुढाकार घ्यावा.
▪️तूळ : इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका. काही समस्या सामोरी येऊ शकतात. घरात किरकोळ कुरबुरीचे वातावरण राहील.
▪️वृश्चिक : कमी बोलून कृतीवर भर द्यावा. याची सकारात्मक फळे दिसतील. कामे धिम्या गतीने पार पडतील.
▪️धनु : एखादे काम मधेच सोडू नका. स्वकर्मावर विश्वास ठेवा. मनातील चीड व्यक्त करताना सबुरी बाळगा.
▪️मकर : इतरांच्या गोष्टीत लक्ष घालू नका. अधिकार्‍यांशी मतभेद टाळा. क्षुल्लक बाबी नजरेआड कराव्यात.
▪️कुंभ : सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. नियोजित कामे पार पडतील. घरगुती प्रश्नांकडे लक्ष द्यावे. जुन्या मित्रांशी संपर्क साधावा.
▪️मीन : दिवस चांगला जाईल. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. तुमचा प्रभाव कायम राहील. जवळच्या प्रवासात सतर्क रहा.