Take a fresh look at your lifestyle.

‘ओ शेठ’ …गाण्याचा वादच मिटलाय थेट !

'मनसे'ची मध्यस्थी आली कामी.

 

 

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात धुमाकुळ असलेले ‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ हे गाणे चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या गीतकार संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी केला होता, यावेळी त्यांनी गायक उमेश गवळी यांच्यावर काही आरोप केले होते.याबाबत वृत्तवाहिन्या आणि वेब पोर्टलवर बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट आघाडी आणि चित्रपट महामंडळाने मध्यस्थी करत हा वाद मिटवला असून दोन्ही गटांनी एकत्र येत हा वाद मिटला असे सांगितले.
उमेश गवळी,विरुद्ध संध्या केशे हा वाद महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना, चित्रपट महामंडळ यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे संपुष्टात आला आहे.काही नियमांचे पालन करत आता हे दोन गट एकत्रित पुढे वाटचाल करणार आहेत.
प्रणिकेत खुणे, संध्या केशे आणि उमेश गवळी यांच्यात गाण्याच्या कॉपीराईटवरून वाद झाला होता. परिणामी हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे या तिघांचेही मोठे आर्थिक नुकसान होत होते. संध्या केशे आणि प्रणिकेत खुणे यांनी या वादा बाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या कडे धाव घेतली होती. महाराष्ट्र चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अभिनेते रमेश परदेशी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व जयराज लांडगे यांच्या माध्यमातून महामंडळाच्या लवादासमोर हा वाद चर्चेने सोडविण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष जयराज लांडगे म्हणाले, ‘‘वादाच्या पार्श्‍वभूमीवर संध्या केशे, प्रणिकेत खुणे आणि उमेश गवळी मनसे चित्रपट सेनेकडे आले होते. या मराठी कलाकारांचे नुकसान होऊ नये, यांच्यात फूट पडू नये, म्हणून मनसेने चित्रपट सेनेने चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या माध्यमातून आणि हा वाद मिटवला आहे. मराठी कलाकारांनी एकमेकांचे पाय न ओढता, यापुढे एकत्र राहून अधिक चांगले काम करावे. मराठी कलाकारांना सर्वतोपरी मदत करण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची आहे.’’