Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ !

हवामान विभागाने दिला इशारा.

0

मुंबई: या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. यातच आता राज्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट  तर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.  या कारणामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव  या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, सिंधुदुर्ग, नंदुरबार,पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.