Take a fresh look at your lifestyle.

आमदार निलेश लंके यांच्यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी साधला पुन्हा निशाणा !

विमानप्रवासातील 'तो' फोटो केला ट्विट !

 

 

पारनेर : पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या दौऱ्याबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विट करत जोरदार निशाणा साधला आहे. ‘पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीसाठी या सगळ्यांनी केलेला नवस फेडायला गेलेत म्हणे,एका महिलेला हटवल्याचा असूरी आनंद दिसतोय चेहऱ्यावर ,वाईट गोष्ट ही कि यात सरकारमधल्यांपासून सगळेच सहभागी’ असं ट्विट करत त्यासोबत पारनेरचे आमदार निलेश लंके, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप , ठाणे अंमलदार भालचंद्र दिवटे यांचा विमानातील फोटो चित्रा वाघ यांनी पोस्ट केला आहे.
सोबतच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,ओळखलतं का यांना? नगर पारनेरचे PI बळप तर पोलिस दिवटे आमदार निलेश लंके या २ पोलिसांना विमानाने फिरवून आणताहेत. एव्हढी बडदास्त आमदार ठेवतोय म्हंटल्यावर त्याने या पोलिसांसमोर कुठल्या महिलांना शिव्या देवो किंवा हात उगारो जीभ कशी रेटेल बोलायला आणि हात कसे उठतील कारवाईसाठी ? असं चित्रा वाघ यांनी केले आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे आणि आमदार निलेश लंके यांच्यातील वाद हा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. हाच मुद्दा घेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ज्योती देवरे यांची भेट घेत राळ उठवली होती, यावरून प्रचंड राजकारण देखील तापले होते, दरम्यान पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली करा अन्यथा आमची इतरत्र बदली करा म्हणत काम बंद आंदोलन केले होते. ज्योती देवरे या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देत नाहीत असा आरोप त्यांनी केला होता.
दरम्यान ज्योती देवरे यांची बदली झाली, मात्र त्यांची बदली झाल्यानंतर आमदार निलेश लंके यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विमान दौरा घडवत नवस फेडल्याचे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निलेश लंके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.