Take a fresh look at your lifestyle.

बापरे ! पुराच्या पाण्यात एस.टी. बस गेली वाहून !

प्रवाशी बसलेत टपावर ; बचावकार्य सुरु.

 

यवतमाळ : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक दुर्घटना घडत आहे. पुराच्या पाण्यात हिरकणी एसटी बस वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. यवतमाळच्या उमरखेडच्या दहागाव पुलावरून एसटी बस वाहून गेली. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
पुलावर पाणी असताना चालकाने बस नेल्याने ही दुर्घटना घडली आहे. उमरखेड पुसद रस्त्यावर दहेगाव नाल्यावरुन पाणी जात असतांना नागपूर डेपोची एसटी बस ड्रायव्हरने नाल्यावरुन नेली. चालकाने कोणताही अंदाज न घेता बस पाण्यात टाकल्याने गाडी नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. बसमधे चार ते सहा प्रवासी होते असे समजते.  उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी आहेत. स्थानिक नागरिक व तालुका टिमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.. दोन लोक झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटीबसच्या टपावर आहेत.
एसटी बस नाल्यात वाहून गेल्यानंतर एसटीतील दोन प्रवासी झाडावर चढलेले आहेत व दोन लोक एसटी बसच्या टपावर आहेत. कंडक्टरनं झाडावर असून त्याने सोबत ५ते ६ प्रवासी असल्याचे ओरडुन सांगितले. त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बस नागपूर डेपोची होती नांदेड वरून नागपूरला निघाली होती.