Take a fresh look at your lifestyle.

…आता पुढील टार्गेट रश्मी ठाकरे !

किरीट सोमय्या यांचा इशारा.

 

 

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत. त्यावेळी त्यांनी हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा असे थेट आव्हान दिले आहे.
यावेळी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढील टार्गेट रश्मी ठाकरे असतील, असा इशाराच दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे वहिनींच्या नावाचा बंगले घेण्यासाठी वापर केला. त्यांच्या नावाने 21 बनले बनविले, असा गंभीर आरोप भाजप नेते माजी आमदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मला जर कोणी अडवलं तर मी अजून घोटाळे बाहेर काढणार आहे, असा इशाराही किरीट सोमय्यांनी बोलताना दिला आहे.कोल्हापुरात जाऊन मी अंबाबाईला प्रार्थना करणार आहे की, तू पाप करणाऱ्या राक्षसांचा वध केला आहे. राज्यातील भ्रष्टाचार रूपी राक्षसाचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे, असे किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेचं हसन मुश्रीफांनी मला अडवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. आता मला त्यांनी अडवून दाखवावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले आहे.