Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸5 सप्टेंबर 2021

 

▪️मेष : आजचा दिवस संमिश्र आहे. आज कृतीवर संयम ठेवण्याची व राग द्वेषापासून दूर राहण्याची गरज आहे.

▪️वृषभ : तब्बेत चांगली राहील. मन प्रसन्न असेल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या वार्ता येतील.

▪️मिथुन : घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. खर्च होईल पण तो नाहक जाणार नाही. आर्थिक लाभाची शक्यता.

▪️कर्क : आज जरा दक्ष राहा. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभाला अनुचित दिवस. मानसिक अशांतता आणि उद्वेगाने मन भरून जाईल.

▪️सिंह : घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की तुम्हाला दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील.

▪️कन्या : बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे बनाल. आप्तमित्र यांची भेट होईल.

▪️तूळ : आज आपली मनःस्थिती द्विधा होईल. नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी दुरुनच संबंध ठेवा नाहीतर मतभेद होतील.

▪️वृश्चिक : आजचा दिवस साधारणच जाईल. तन-मनाला सुख- आनंद मिळेल. कुटुंबियां समवेत उत्साह व आनंदात वेळ घालवाल.

▪️धनु : कुटुंबियां सोबच मतभेदाचे प्रसंग घडतील. स्वभावात रागीटपणा आल्याने कोणाशी वाद घालू नका. स्वास्थ्य बिघडू शकते.

▪️मकर : मित्र आणि स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.

▪️कुंभ : आज अनुकूल दिवस. आपले प्रत्येक काम सहजगत्या पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील.

▪️मीन : शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांबरोबर सांभाळून कार्य करा. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल.