Take a fresh look at your lifestyle.

….म्हणून ‘या’ लाकडाला देवाचे लाकूड म्हटले जाते! 

किंमत आहे सोन्यापेक्षाही जास्त.

 

 

 

जगातील सर्वात दुर्मीळ लाकडाची किंमत चक्क हिरे आणि सोन्यापेक्षाही अधिक आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल, या लाकडात असं काय खास आहे. चला, तर या लाकडाबाबत अधिक जाणून घेऊयात…
अकिलारियाच्या झाडापासून जे लाकूड मिळते त्या लाकडाला अगरवूड, ईगलवूड किंवा एलोसवूड या नावाने ओळखले जाते. हे लाकूड विशेषतः चीन, जपान, भारत, अरबस्थान आणि दक्षिणपूर्वी आशियामध्ये सापडत असते. हे लाकूड जगातील अत्यंत दुर्मीळ आणि सर्वात महागडे लाकूड मानले जाते.
आत्ताच्या घडीला भारतात एक ग्रॅम हिऱ्याची किंमत ३ लाख २५ हजार तर १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५ हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. मात्र अगरवूडच्या केवळ १ ग्रॅम लाकडाची किंमत जवळपास ७ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
हे लाकूड जपानमध्ये क्यानम किंवा क्यारा या नावाने ओळखले जाते. या लाकडापासून अत्तर आणि परफ्युम बनवला जातो. या लाकडाच्या राळेपासून ओड तेलही मिळवले जाते. हे तेल सेंटमध्ये वापरतात. सध्या या तेलाची किंमत २५ लाख रुपये प्रति किलो एवढी आहे. यामुळेच अगरवूडला वूड ऑफ गॉड्स म्हणजेच देवाचे लाकूड असे म्हटले जाते.