Take a fresh look at your lifestyle.

निघोजचे मुलिकादेवी महाविद्यालय ‘नॅक’साठी सज्ज !

शैक्षणिक गुणवत्तेतून उमटविला वेगळा ठसा.

 

 

 

पारनेर :अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निघोज येथे श्री. मुलिकादेवी महाविद्यालय स्थापन होऊन आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने अल्पावधीत उच्च कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल महाविद्यालयांना त्यांच्या गुणवत्तेनुसार
दर्जा देणारी व भारतीय उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन करून मान्यता देणारी बंगळुरू येथील संस्था याद्वारे महाविद्यालयाचे मूल्यांकन दि. 28 व 29 सप्टेंबर 2021 रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालय या समितीसाठी सज्ज झाले आहे.
‘तेजो सी तेजो मे देही’ हा उद्देश ठेऊन ग्रामीण भागात मुलांच्या शिक्षणासाठी हे महाविद्यालय सुरू झाले असून स्थापनेपासूनच महाविद्यालयाने निघोज परिसरात आपला ठसा उमटविला आहे,सुसज्ज इमारत, उच्च शैक्षणिक दर्जा, नामवंत प्राध्यापक, वनस्पती शास्त्र उद्यान, हिरवागार परिसर, नावीन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास ही या महाविद्यालयाची ओळख आहे.
सदर समिती महाविद्यालयातील सर्व सुविधा, शिकवले जाणारे सर्व अभ्यासक्रम, राबवले जाणारे सर्व उपक्रम याचा आढावा घेणार आहे.
दरवर्षी होणारे विविध उपक्रम व या उपक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी होतात हे परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी अनुभवले आहेत. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असणारे उपक्रमशील महाविद्यालय ठरले आहे. विद्यार्थ्याच्या ज्ञान व कौशल्यात भर घालणारे हे महाविद्यालय असून स्पर्धा परीक्षा केंद्राद्वारे या महाविद्यालयाने अनेक मोठे अधिकारी बनवले आहेत तसेच परिसरातील अनेक विद्यार्थी
वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत.
सर्वच क्षेत्रातील नामवंत, तज्ञ व्यक्ति या महाविद्यालयात येऊन मार्गदर्शन करत असतात त्यामुळे ग्रामीण भागातील या महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करून यशस्वी विद्यार्थी घडविले आहेत. यासाठी बंगळुरू येथील संस्था या महाविद्यालयाच्या तपासणीसाठी येत आहे. यावेळी आजी विद्यार्थी मेळावा, माजी विद्यार्थी मेळावा, पालक मेळावा होणार आहे यासाठी परिसरातील सर्व पालक व विद्यार्थ्यांनी मंगळवारी महाविद्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सहदेव आहेर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर एरंडे यांनी केले.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, सदस्य राहुल झावरे यांनी महाविद्यालयास शुभेच्छा दिल्या आहेत.