Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात भारत बंदला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा !

नायब तहसीलदारांना दिले निवेदन.

 

पारनेर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने केंद्र सरकारने केलेले शेतीविषयक तिन्ही कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत त्यामुळे ते रद्द करावेत या मागणीसाठी आयोजीत भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी पारनेर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य कॉ. आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
दहा महिन्यापासून हजारो शेतकरी दिल्ली बॉर्डरवरती आंदोलन करत आहेत तरी देखील केंद्र सरकार काळे कायदे रद्द करताना दिसत नाही.केंद्र सरकारने केलेले १) शेतीमाल विक्री कायदा २०, २)कंत्राटी शेती कायदा२०, ३)अत्यावश्यक वस्तू कायदा२० हे तीनही कायदे रद्द करावेत वीज विधेयक मागे घ्यावे किमान आधारभूत किंमतीचा कायदा करावा सोयाबीनची आयात बंद करुन देशातील शेतकऱ्यांकडुन हमी भावाने सोयाबीन, मुग, उडीद आदि दाळ वर्गीय पिकांची नाफेडद्वारे बाजार समितीमध्ये खरेदी करावा या मागणीसाठी आज भारत बंद आयोजित करण्यात आला होता.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
या बंदला पाठिंबा देत असल्याची माहिती भाकपचे सचिव कॉ. संतोष खोडदे यांनी दिली.
निवेदन देण्यासाठी सुलाबाई आदमाने, दिपक खंदारे, बबन रावडे, हेमंत पाटील, भाऊसाहेब भगत, नानाभाऊ खामकर, संपत रावडे, अशोक गायकवाड, संतोष ठुबे, ज्ञानदेव गायकवाड, बापू गावडे यांच्या सह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.