Take a fresh look at your lifestyle.

सोनं खरेदी करण्याआधी एकदा हा लेख वाचाच! 

... तर तुमची फसवणूक होणार नाही.

 

हल्ली सोन्याचे भाव घसरत चालले आहे. त्यामुळे अनेकजण गुंतवणुकीची हीच योग्य संधी आहे, असे समजत आहे. मात्र सोनं खरेदी करताना तुमची फसवणूक तर होत नाही, याची काळची घेणंही गरजेचं आहे. चला, तर पाहूयात सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी…
● सोन्याची शुद्धता ही कॅरेटवरून ठरवली जात असेल. त्यातील 24 कॅरेटचं सोनं सर्वात शुद्ध मानलं जातं. मात्र आता हॉलमार्क अनिवार्य झाल्याने देशात केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे.
● प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्क नंबर निश्चित आहेत. सराफांकडून 22 कॅरेटसाठी 916 क्रमांक, 18 कॅरेटसाठी 750 क्रमांक आणि 14 कॅरेटसाठी 585 क्रमांक वापरला जातो.
● 22 कॅरेट सोन्यात 91.6 टक्के सोनं असतं. हिरे किंवा इतर मौल्यवान धातू जडवलेले दागिने 18 कॅरेट सोन्यात बनतात.
● केवळ हॉलमार्कवालेच दागिने शुद्ध मानले जातात. त्यामुळे दागिने घडवताना सोनं हॉलमार्क प्रमाणित असल्याची खात्री एकदा करून घ्या.
● सोन्याच्या दरांबद्दल अपडेट रहा. वर्तमानपत्र, इंटरनेटवरही याची माहिती असते. दागिने घडवताना घडणावळीचं शुल्क आकारलं जातं. त्यात अतिरिक्त शुल्क नाही ना, याकडे लक्ष द्या.
● जुना दागिना घेऊन नवा खरेदी करण्याच्या अनेक ऑफर सुरु असतात. मात्र भुरळला बळी न पडता शुद्धतेबाबत सोन्याची तडजोड करू नका. काही सराफ व्यवसायिक अनेक प्रकारचं शुल्कही आकारतात. अशात अतिरिक्त शुल्क देऊन बजेट वाढवून घेऊ नका.