Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांना सांगू,आमचं ऐका नाहीतर… !

खा.संजय राऊतांनी केले राष्ट्रवादीला 'लक्ष्य' 

 

 

 

पिंपरी चिंचवड : शिवसेना नेते खासदार संजय राऊत आजच्या सामनामधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू घेताना पहायला मिळाले आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी अजित पवारांना उद्देशून भाष्य केले. खा. राऊत यांनी पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मार्गदर्शक मेळावा घेतला. यावेळी बोलताना खा. राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले.
या मेळाव्यात बोलताना ते म्हणाले कि, पालकमंत्री आपले नाहीत परंतु राज्यात आपली सत्ता आहे. इथे आपले कोणीच ऐकत नाही, असे म्हटले जाते. मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री देखील आपलेच आहेत. अजित पवारांना सांगू आमचं ऐका. त्यांनी नाही ऐकलं तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला असे विधान करताच एकच हशा पिकला. तर असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं. त्यामुळे राऊत यांचं राष्ट्रवादीला हे थेट आव्हानच आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
यानंतर लगेच खा.राऊत यांनी सारवासारव करण्यास सुरुवात केली. बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली