Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंतने चक्क पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मागणी !

म्हणे, अमेरिकेवरुन येताना माझ्यासाठी...

 

 

मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौर्‍यावर असून नुकतेच त्‍यांनी अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली आहे. याचदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक भेटवस्तू मागितली आहे. बाॅलिवूड अभिनेत्री राखी सावंत सतत तिच्या मजेशीर व्हिडीओमुळे चर्चेत असते. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर राखी नेहमीच परखडपणे व्यक्त होते.
राखीने चक्क पंतप्रधान मोदींकडे सामानाची लिस्ट पाठवली असून त्यांना अमेरिकेतून तिच्यासाठी काही वस्तू आणायला सांगितल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ विरल भय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखीने चक्क पंतप्रधानांना तिच्यासाठी शॉपिंग करायला सांगितली आहे.
राखीला प्रश्न केल्यानंतर नरेंद्र मोदी नमस्कार! तुम्ही अमेरिकेला गेला हे ऐकून आनंद झाला असल्याचं राखीने म्हटलं आहे. तेथील सर्व भारतीयांना माझा नमस्कार आणि प्रेम द्या, तेथील भारतीयांवर माझं प्रेम असल्याचं राखीने म्हटलं आहे. तसेच यावेळी येताना माझ्यासाठी शाॅपिंग करुन या, अशी मागणी राखीने केली आहे.