Take a fresh look at your lifestyle.

लिफ्टमध्ये आरसा नक्की का असतो?

कधी ऐकले का 'हे' कारण ?

 

आपण अनेकदा लिफ्ट वापरली असेल. या लिफ्टमध्ये आरशात न्याहाळणे अनेकांच्या आवडीचा विषय आहे. मात्र तुम्ही कधी हा विचार केला आहे का? लिफ्टमध्ये आरसा का लावला गेला असेल? तर आज त्याबाबत जाणून घेऊयात.

लिफ्टचा शोध 1853 साली लागला. सुरवातीच्या काळात लिफ्टमध्ये आरसे नव्हते. या दरम्यान लोकांना असे वाटू लागले की, पायऱ्यांच्या तुलनेत लिफ्टमध्ये अधिक वेळ लागतोय. मग याबाबत लिफ्ट बनविणाऱ्या कंपनीकडे तक्रार केली गेली. या समस्येवर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात सुरु झाला. अनेक खर्चिक गोष्टी समोर आल्या मात्र तोडगा काही निघेना.

मग वैज्ञानिकांनी आपला फोकस लोकांकडे वळवला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की, लोकांना लिफ्टचा स्पीड कमी वाटतो. कारण त्यावेळी त्यांच्याकडे यावेळेत करायला काहीही नसते. मग यावर तोडगा म्हणून लिफ्टमध्ये आरसे लावले गेले.

आरसे लावल्याने लोकांचे लक्ष लिफ्टच्या स्पीड पेक्षा आरशावर गेलं. ही आयडिया यशस्वी ठरली आणि लोकांच्या स्पीड बाबतच्या तक्रारी येणं बंद झाल्या. थोडक्यात काय तर लोकांची मानसिकता विचारात घेऊन लिफ्टमध्ये आरसे बसवले गेले आहेत.