Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कुत्र्याच्या नावावर आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड !

याचे कारणही आहेच तसे...

 

 

 

 

एक विचित्र रेकॉर्ड अमेरिकेत राहणाऱ्या कुत्र्याच्या नावावरही नोंदवला गेलाय. या श्वानाचं नाव ‘लू’ असून त्याच्या कानाची लांबी पृथ्वीवरील सर्व कुत्र्यांमध्ये सर्वाधिक असल्याचे बोलले जाते आहे. यामुळे त्याचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलंय.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 वर्षीय ‘लू’च्या कानाची लांबी 13.38 इंच एवढी आहे. लू ओरेगनमध्ये मालकिणी पेग ऑल्सेनसोबत राहतो. त्याच्या मालकिणीनं सांगितलं की, लूचे कान मोठे असल्याचं त्यांना अंदाज होता. मात्र, त्यांनी त्याची लांबी मोजली नव्हती.
पेग यांनी सांगितलं की, जेव्हा पहिल्यांदा ‘लू’ला पाहिलं तेव्हाच तिला तो खूप आवडला. ती त्याचे लांब कान नेहमी नोटीस करत असे. अखेर तिनं त्याच्या कानांची लांबी मोजण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेगळेपणामुळे लूचं नाव प्रसिद्ध झालं आहे.
लू काळ्या आणि टॅन कलरचा कुत्रा आहे. पेगचं म्हणणं आहे, की लू ज्या प्रजातीचा आहे त्यामधील कुत्र्यांचे कान इतर कुत्र्यांच्या तुलनेत लांबच असतात. लूचे लांब काम त्याची शारीरिक समस्या नाही. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कानांना हात लावायची इच्छा होत असते.