Take a fresh look at your lifestyle.

तहसीलदारांचा ‘हा’ डाव आला उघडकीस ; यंत्रणाही ढिम्म !

... तर मंत्रालयातच आत्मदहन करण्याचा इशारा.

 

शिरूर : शिरूर येथील तहसीलदारांना शासनाच्या अब्जावधी रुपयांचा महसूल बुडवून स्वतःची महसूल यंत्रणा कामाला लावली असताना त्यांचा हा डाव उघडकीस येऊनही महसूल यंत्रणा ढिम्म पडल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सगळे पुरावे असतानाही कारवाईस टाळाटाळ होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी मुंबई येथे मंत्रालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
शिरूर येथील तहसीलदारांनी शिरूर तालुक्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे त्या कायम वादाच्या भोवऱ्यात आहेत. 2019 पासून गौणखनिज बोगस कारवाया हा एक पायंडाच त्यांनी पाडला असून वाळूची जप्त केलेली वाहने सहज सोडून देणे,कोटीचे पंचनामे करणे करून सरकारी कागदपत्रे नष्ट करून टाकणे. यामागच्या मुख्य सूत्रधार या तहसीलदारच आहेत.
कोणतीही माहिती मागितल्यावर माहितीच्या अधिकाऱ्याला पण त्यांनी केराची टोपली दाखवली. तसेच भ्रष्टाचारात दोषी आढळल्याने महसूलचे काही कर्मचारी निलंबितही करण्यात आलेले आहेत. शिरूरच्या महसूल खात्याने भ्रष्टाचाराचा उच्चांक गाठला असून तळेगाव ढमढेरे येथील यातील कारवाई करून लावलेल्या वाळूच्या गाड्या पळवून लावल्याप्रकरणी प्रत्यक्ष लाखो रुपये स्वीकारून महसूलच्याच एका अधिकाऱ्याने तहसीलदाराच्या विरोधात पुरावे म्हणून लेखी खुलासा दिल्यानंतरही दोषी तहसीलदारवर कारवाई होत नाही. याचाच अर्थ म्हणजे पूर्ण यंत्रणाच या भ्रष्टाचारात सामील आहे त्यामुळे सामान्य जनता या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा तयारीत असून शिरूरच्या तहसीलदार यांना निलंबित करूनच सर्व प्रकरणाची शहानिशा करावी अशी मागणी पुढे येत आहे.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी सांगितले की, शासनाच्या अब्जावधीचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा व्हावा म्हणून मी जिल्हाधिकारी ते शासनाचे मुख्य सचिव यांच्याशी लेखी व समक्ष संपर्क केला आहे. तालुक्यातील सर्व सामान्य जनता माझ्या पाठीशी असून यापूर्वीही अधिकारी शिरूर मधून पायउतार झाले आहेत. परंतू शासनाने अशा भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये. अशा चुकीच्या वृत्तीचा बिमोड करण्याच्या निर्धाराने निवेदन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच पुण्याचे आयुक्त यांना मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याची आगाऊ नोटीस दिली असून 1ऑक्टोबर रोजी आत्मदहन करणारच असे अशोक भोरडे यांनी ‘पारनेर दर्शन’शी बोलताना सांगितले.