Take a fresh look at your lifestyle.

‘या’ सवयी मुलींना कधीच आवडत नाहीत…!

तर बदलुन टाका अशा सवयी.

 

 

आज आपण मुलांच्या अशा काही सवयीबद्दल सांगणार आहोत, ज्या मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यासाठी खालील काही सवयी बदलणे गरजेचे आहे.
▪️स्वत:ची स्तुती करणारे : मुलींना कायम स्वत:ची स्तुती करणारे मुलं बिलकूल आवडत नाहीत. त्यामुळे केवळ स्वतःच्या स्तुतीत दंग राहू नका.
▪️कंट्रोल करणारे : अनेक मुलांना प्रत्येक गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हावी असे वाटत असते. मग ते समोरील व्यक्तीला कंट्रेल करु लागतात अशा प्रकाचे मुलं मुलींना अजिबात आवडत नाही.
▪️नाटकं करणारे : अगदी किरकोळ गोष्टीमध्ये नाटकं करणारी, कारणं सांगणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाही. म्हणून त्या अशा मुलांपासून लांब राहणे पसंत करतात.
▪️दूसऱ्यांवर जळणारे, गॉसिप करणारे : जी मुलं दुसऱ्यांबद्दल बोलताता, पर्सनल गोष्टींबद्दल कमेंट करतात, अशी मुलं मुलींना आवडत नाही. त्यामुळे असं जर तुम्ही करत असाल तर वेळीच थांबवा.
▪️खोटं बोलणारे : आपली एक चूकी लपवण्यासाठी एका मागोमाग खोटं बोलणारे मुलींना आवडत नाही. अशा लोकांवर कधीही विश्वास ठेवता येत असल्याने मुली अशा मुलांपासून मुली दूर राहतात.
▪️कौतुक न करणारे : मुलींना स्वत:चे कौतुक करुन घ्यायला नेहमी आवडते. अशात जर एखाद्या मुलानं मुलीचं कौतुक केलं नाही, तर ते त्यांना आवडत नाही. मुलींना प्रोत्साहित करणारा मुलगा आवडतो, जो तिला प्रत्येक गोष्टीत मदत करेल, साथ देईल.