Take a fresh look at your lifestyle.

भाळवणीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन !

तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी दिला कार्याला उजाळा.

 

भाळवणी : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पारनेर तालुका भाजपाच्या वतीने त्यांना भाळवणी येथे आज अभिवादन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी उपाध्याय यांच्या कार्याला उजाळा दिला.
पंडित उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने तालुकाध्यक्ष चेडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित रोहोकले, कुशाहरी भांड,अशोक चेडे आदी.उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष वसंत चेडे म्हणाले की,पंडित दीनदयाळ उपाध्याय हे थोर विचारवंत व चिंतक होते. देश विकासाच्या अनेक मुद्यांवर त्यांनी चिंतन केले. विचार मांडले. त्यांची विचारसरणी पुढे नेत देशाचा विकास करण्याच्या उद्देशाने दिल्लीला १९६८मध्ये दीनदयाळ स्मारक समितीची स्थापना झाली. अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी तर सचिव नानाजी देशमुख होते. नानाजींनी १९७८मध्ये राजकीय जीवन संपवून समाजकार्यात उडी घेतली. दीनदयाळ स्मारक समितीची पुनर्स्थापना केली. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्मता मानवतावादाला जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीची जोड देऊन दीनदयाळ स्मारक समितीचे ‘दीनदयाळ शोध संस्थान’मध्ये परिवर्तन करण्यात आले. देशाच्या ग्रामीण भागातील सामाजिक व आर्थिक सुधारणेची पायाभरणी करण्यात आली. असेही श्री.चेडे यांनी यावेळी सांगत पंडित उपाध्याय यांच्या कार्याला उजाळा दिला.