Take a fresh look at your lifestyle.

मनोहरमामाच्या छातीत निघतात कळा !

सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू.

 

सोलापूर : संत बाळूमामांचा अवतार असल्याचं सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या मनोहरमामा ऊर्फ मनोहर भोसले सध्या चांगलेच अडचणीत सापडले असल्याचे पहायला मिळत आहे. अघोरी पद्धतीने उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक मनोहर भोसलेला केली होती.
तर काही दिवसांपूर्वी मनोहर भोसले याला करमाळा कोर्टाकडून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे येत्या 27 सप्टेंबरपर्यंत मनोहर भोसले पोलीस कोठडीत आहे. महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसात ते अटकेत आहेत. दरम्यान आता मनोहर भोसले याला छातीत दुखु लागल्याने उपचारासाठी सोलापूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
23 सप्टेंबर रोजी रात्री 11:30 वाजता मनोहर भोसले यांना अत्यवस्थ वाटु लागले, छातीमध्ये दुखू लागल्याने त्याला उपजिल्हा रूणालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रात्रीच्या दरम्यान दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बारामतीत कर्करोग बरा करण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे.
तर सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आला आहे. मनोहर भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, मनोहर पासून सद्गुरू मनोहर मामा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्य वाटायला लावणारा आहे.