Take a fresh look at your lifestyle.

यंदा UPSC च्या यशाचा ‘नगरी पॅटर्न’ !

जिल्ह्यातील 4 जणांना घवघवीत यश!

 

 

 

 

अहमदनगर : यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील चार जणांना यश मिळालं आहे. यामध्ये विनायक नरवडे, सुरज गुंजाळ, विकास पालवे आणि अभिषेक दुधाळ या चौघांचा समावेश आहे.
▪️विनायक नरवडे : विनायकने 37 वी रँक मिळवली आहे. तो दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण झाला. विनायकने पुणे येथे इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर अमेरिका येथे जाऊन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेथेच त्याने एक वर्ष जॉब देखील केला होता. सध्या नगर शहरातील सावेडी येथील रहिवासी असून तो मुलाचा कुकाण्याचा आहे.
▪️सुरज गुंजाळ : नगर शहराजवळील नवनागापूर येथील सुरजने पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. त्याला 353 वी रॅंक मिळाली आहे. त्याने सिंहगड कॉलेज पुणे येथून इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे.
▪️अभिषेक दुधाळ : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील अभिषेक दिलीप दुधाळने युपीएससी परीक्षेत सलग दुसऱ्यांदा यश मिळविले आहे. त्याला 469 वी रॅंक मिळाली असून मुंबई येथील व्हीजेटीआय कॉलेजमधून त्याने बी. टेक केले आहे. अभिषेक 2018 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तो पहिल्याच प्रयत्नात 2019 मध्ये उत्तीर्ण झाला. सध्या तो इंडियन रेल्वे ट्रॉफिक सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असून त्यानंतर अभ्यासात सातत्य ठेवून पुन्हा परीक्षा देऊन त्याने यश संपादन केलंय.
▪️विकास पालवे : नेवासे तालुक्यातील सोनईचा विकास चार वर्षांपासून युपीएसची परीक्षेची तयारी करीत होता. त्याला चौथ्या प्रयत्नात यश मिळाले असून त्याने 587 वी रँक मिळवलीय. पुण्यातील व्हीआयटी येथून विकासने 2016 मध्ये इंजिनीअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती.