Take a fresh look at your lifestyle.

जिल्हा सहकारी बँकेची आज ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा. 

झुम अॅपवर सभासदांना सहभागी होता येणार.

 

अहमदनगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सन २०२० – २०२१ सालाची वार्षिक सर्वसाधारण सभा (अधिमंडळाची वार्षिक बैठक) आज (शनिवारी ) दुपारी ठीक १.०० वाजता अहमदनगर येथील स्टेशन रोडवरील बँकेच्या “यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात” बँकेचे चेअरमन उदय गुलाबराव शेळके यांचे अध्यक्षतेखाली ऑनलाईन आयोजित केलेली आहे.
ही वार्षिक सर्वसाधारण सभा यंदाच्या कोव्हीड-१९ महामारीच्या प्रकोपामुळे शासनाच्या निर्देशाचे पालन करण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने त्यांचे त्यांच्या शासन आदेशानुसार तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ अन्वये सदरची सभा ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आलेली आहे. ही सभा दृकश्राव्य किंवा अन्य दृष्यसंवाद या माध्यमातून आयोजित केलेली आहे. सदर सभा ऑनलाईन पध्दतीने होणार असल्यामुळे सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती अपेक्षित नाही. यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभेस आपण ऑनलाईन पध्दतीने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
▪️सभेपुढील विषय
१. मागील दिनांक २७-०३-२०२१ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे. (सदर इतिवृत्त कामाच्या दिवशी, कामाच्या वेळेत बँकेच्या मुख्य कार्यालयात सभासदांना पाहता येईल.)
२. माननीय संचालक मंडळाने सादर केलेल्या सन २०२० – २०२१ (ता. १-४-२०२० ते ३१-३-२०२१ अखेरच्या कालावधीचा) सालाचा बँकेच्या कामकाजाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफातोटा पत्रक इत्यादी हिशोबाची पत्रके व नफावाटणी तसेच सन २०२१ – २०२२ सालासाठीचे उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करणे.
३. सन २०१९- २०२० सालाचा मा. वैधानिक लेखापरीक्षक यांचा वैधानिक तपासणी अहवाल व त्यावरील दोष दुरुस्ती अहवाल नमूद करणे. तसेच सन २०२० – २०२१ सालाच्या वैधानिक (स्टॅच्युटरी) तपासणी अहवालाची नोंद घेणे.
४. सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षणासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे.
५. मा. संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे सन २०२१-२०२२ सालासाठी स्थानिक हिशोब तपासणीस (लोकल ऑडिटर) यांची नेमणूक करणे व त्यांचा मुशाहिरा संमत करणे.
६. बँकेच्या ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस (अधिमंडळाची वार्षिक बैठक) अनुपस्थित असलेल्या बँकेच्या अनुपस्थिती क्षमापित करणे.
७. मा. संचालक मंडळाने सुचविल्याप्रमाणे पोटनियम दुरुस्तीचा विचार करणे व ती संमत करणे.
८. मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.
▪️ झुम अॅपच्या खालील लिंकवर सभेत सहभाग घेता येईल.
https://zoom.us/j/97814136766?pwd=dG9UdU5kSnUwZ1BPWUpnaGh2WUZrdz09