Take a fresh look at your lifestyle.

‘ओ शेठ’… गाणचं गेलयं चोरीला थेट !

मालकी हक्कावरून झाला वाद.

0

 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकुळ घालत भल्याभल्यांना अक्षरक्ष: वेड लावणाऱ्या ‘ओ शेठ’ या गाण्याची खुद्द गायकानेच चोरी केल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. हे गाणं डीजे प्रनिकेत आणि संध्या या दोघांनी तयार केलं होतं. गाणे लिहून ते संगीत देण्यापर्यंतची पूर्ण प्रक्रिया या दोघांनी पूर्ण केली होती. पुण्यातील उमेश गवळी या गायकाने ते गायले. या तिघांचे कौतुक संपूर्ण राज्यभरात होत होते. मात्र आता या गाण्याच्या मालकी हक्कावरून वाद सुरू झाला आहे.
अनेक म्युझिक कंपन्या हे गाणे आपल्या मालकीचे व्हावे म्हणून प्रयत्न करत होत्या. मात्र आता खुद्द गायक उमेश गवळीने हे गाणे आपल्याच मालकीचे असल्याचा दावा केल्याने या दोघांनीही यूट्यूब चॅनलवर कॉपीराइट दाखल केले आहे.त्यामुळे दोघेही आता हतबल झाले आहेत. गीतकारांनी गायकावर आरोप केला आहे की, त्याने आपले गाणे चोरले. त्यांनी तशी नाशिक पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण यासोबतच गायकाने देखील गीतकाराविरोधात तक्रार केली आहे.
‘ओ शेठ… तुम्ही नादंच केलाय थेट’, या गाण्यानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेकांच्या सोशल मीडिया स्टेटसवर हे गाणं पाहायला मिळत आहे. तर अनेकांच्या फोनच्या रिंगटोन आणि कॉलरट्यूनवर हे गाणं ऐकायला मिळतंय. असं हे भन्नाट गाणं उमेश गवळी यांनी गायलं असून त्याचे संगीत प्रनिकेत व संध्या यांनी दिलं आहे.
या गाण्याला संगीतसुद्धा दिलं आहे. या गाण्याची रेकॉर्डिंग केल्यानंतर गाण्याला एवढी प्रसिद्धी मिळेल याची कल्पनादेखील त्यांना नव्हती. मात्र, या गाण्याला युट्यूब तसेच इतर माध्यमांवर कोटीच्या संख्येने पाहिले गेले आहे. या अनोख्या यशामुळे गायक उमेश गवळी तसेच संगीतकार संध्या आणि प्रणिकेत यांना अतिशय आनंद झाला आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.