Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांची’ चौकभरणी झाली अन् जवळपास महाराष्ट्रच शोकसागरात बुडाला !

कोरोनामुळे 'ही' संख्या गेली काही हजारात ...

 

✒️ सतीश डोंगरे

शिरूर : गेले वर्षेभर मृत्यूमुखी पडलेल्या हजारो नागरीकांचा “चौथभरणी”चा विधी शुक्रवारी महाराष्ट्रभर शोकाकूल वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षाच्या इतिहासात प्रथमच कोरोनामुळे ही संख्या काही हजारोंच्या घरात होती. त्यामुळे या विधीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला होता.

मृत तिथीपासून बारा महिन्याच्या आत भाद्रपद वद्यात भरणी नक्षत्रावर मृत व्यक्तीचे श्राध्द केले जाते त्याला “चौथभरणी” किंवा ग्रामीण भागात “मिळवणी” असै ही म्हटले जाते. हिंदू धर्मात श्राद्धला खूप महत्व आहे. पितृ पक्षाची सुरुवात अश्विन महिन्याच्य शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेच्या दिवसापासून होते आणि ती अश्विन अमावस्या तिथीला संपते. हिंदू धर्मामध्ये पालकांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये पुत्राला पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानले गेले आहे.
 प्रत्येकाने आपल्या जन्मदात्या आई -वडिलांना मृत्यूनंतर विसरू नये म्हणून त्यांचे श्राद्ध करण्यासाठी विशेष कायदा सांगितला गेला आहे. पितृ पक्षात हिंदू लोकं मन, कृती आणि वाणीने संयमाचे जीवन जगतात, पूर्वजांचे स्मरण करून पाणी अर्पण करतात, गरीब आणि ब्राह्मणांना दान करतात. पितृ पक्षात प्रत्येक कुटुंबातील मृत पालकांसाठी श्राद्ध केले जाते. सन 2021 मध्ये पितृपक्ष यावर्षी20 सप्टेंबरपासून सुरु झाला आहे.शेवटचे श्राद्ध अर्थात अमावस्या श्राद्ध 6 ऑक्टोबर रोजी असेल.
मागील वर्षभरात अनेक कुटुंबात कोरोनामुळे कोणाचे वडील मुलगा, आई वडील, पती पत्नी, भाऊ बहिण, भाऊ भाऊ, सून सासू यांचे बरोबरच मृत्यू झाले. काही कुटुंबात तर कोरोनाने चार ते पाच जणांचा बळी घेतला .त्या सर्वांचे एकत्रित श्राद्ध करताना आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने अनेक नातेवाईकांचे अश्रू अनावर झाले. त्यामुळे या वर्षीचे भरणी श्राद्ध अनेक कुटुंबात खूपच वेदनादायी व दुःखदायी ठरले