Take a fresh look at your lifestyle.

आकर्षक सेल्फी काढण्यासाठी ‘या’ टिप्स येतील कामी!

'सेल्फी तो बनती है बॉस' !

 

हल्ली वेळ भेटला ’सेल्फी तो बनती है बॉस’ असाच आग्रह पहायला मिळतो. स्मार्टफोनच्या येण्याने ‘सेल्फी’चा जबरदस्त ट्रेंड वाढतच चाललाय. चला, तर आज आपण आकर्षक सेल्फी काढण्यासाठी काय काळजी घ्यायची? याबाबत माहिती पाहूयात…
स्वत:ला न्याहाळा : कधीही सेल्फी घेण्यापूर्वी स्वत:चा चेहरा एकदा आरशात पहा. तुमचा चेहरा नीट दिसतोय का? केस ठीक आहेत का? हे पहा आणि मगच सेल्फी काढा.
वेगळा अँगल : सेल्फी काढताना विविध अँगलचा प्रयोग करून पहा. यामुळे तुम्हाला वेगळी व्हरायटी पहायला मिळेल.
लाईट तपास : तुम्ही ज्या ठिकाणी सेल्फी घेताय त्या ठिकाणी लाईट योग्य आहे का? हे अगोदर तपासा. कारण लाईट ठीक नसेल तर सेल्फी नीट येणार नाही.
हायलाईट पॉईंट नक्की करा : सेल्फीमध्ये तुम्हाला काय हायलाईट करायचंय? ते नक्की करा. ज्या गोष्टीशी तुमची भावना जुळलेली असते. त्याचा नीट फोटो यायला हवा.
बॅकग्राऊंड पहा : एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही घेत असलेल्या सेल्फीमध्ये मागच्या बाजूला काय दिसतंय? ते पहा. कारण तुम्ही आवडीने काढलेला सेल्फी वाईट यायला नको.
वेगवेगळे हावभाव : एकट्या सेल्फीमध्ये अनेकजण हावभाव देत नाही. या सेल्फीला स्वत: तुम्हीही बघणार नाही. त्यामुळे तो अधिक चांगला होण्यासाठी वेगवेगळ्या पोज ट्राय करा. चेहर्‍यावर वेगवेगळे हावभाव द्या.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी।

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं।

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
एक नव्हे दोन-तीन क्लिक करा : सेल्फी काढताना बर्‍याचदा तो चांगला येतोच असे नाही. त्यामुळे एकाच पोझचा सेल्फी किमान दोन-तीन वेळा क्लिक करा.
वरील सर्व मुद्यांचा विचार करून सेल्फी काढला तर तुम्हाला नक्की फायदा होईल…!