पुणे : आत्तापर्यंत साहित्याचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात अनेक कलाकारांनी आपले निरनिराळे व्यवसाय चालू करुन बस्तान बसविले आहे. आता त्यातच भर म्हणून नव्याने कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे अभिजित बिचुकले यांनी सातारी कंदी पेढ्याचे दुकान तर प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी ‘चख ले’ नावाने पुण्यात हाॅटेल चालू केले आहे.
अभिजीत बिचुकले त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले.
साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिले होते. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली. सतत चर्चेत असणारे बिचकुले सध्या करतात तरी काय? असा सवाल अनेकांना पडला असेल.
अभिजीत बिचकुले यांनी नुकतंच पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार हे नक्की. अभिजित बिचकुलेनं पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ आपलं कंदी पेढ्यांचं दुकान थाटलं आहे.
आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्षही वेधून घेतलंय.
अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. “2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार’ , ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’ , ‘कवी मनाचा नेता!’ अशी अनेक वक्त्यव्य अभिजित बिचकुले यांनी केलेली पाहायला मिळतात.
प्रिया बेर्डे यांनी पुण्यातील बावधन परिसरात ‘चख ले’ या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. या हॉटेलमध्ये शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले आहेत . हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये येऊन तिथले कामकाज पाहण्यासाठी येतात. अभिनेत्री प्रिया बेर्डेचे हॉटेल म्हणून पुण्यातील अनेक खवय्यांनी त्यांच्या हॉटेलला भेट देऊन तेथील पदार्थांची चव चाखत आहे. शिवाय तिथल्या पदार्थांचे कौतुक देखील केले आहे. या व्यवसायाबद्दल प्रिया बेर्डेचे सेलिब्रिटींकडून मोठे कौतुक होताना दिसत आहे. हॉटेल व्यवसायात पुन्हा एकदा उचललेलं हे पाऊल इतर महिलांसाठी निश्चितच प्रेरणा देणारं आहे.नव्याने स्थापन केलेल्या तिच्या ह्या हॉटेलमध्ये खवय्यांना पंजाबी, चायनीज, पावभाजी, ज्यूस असे पदार्थ चाखता येणार आहेत.