Take a fresh look at your lifestyle.

सुजित पाटलांनी साधला आजी,माजी आमदारांवर निशाणा !

एकही प्रकल्प केलाच नाही ; जलपुजनाची घाई कशाला ?

पारनेर : गेल्या पंधरा, साडेसतरा वर्षात तालुक्यात एकही लघुपाटबंधारे प्रकल्प झाला नाही. त्यामुळे आपण एखादं धरण बांधावं व नंतरच त्याचे जलपुजन सर्वांनी करावे असे सांगत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी आ.नीलेश लंके तसेच विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांना टोला लगावला.
झावरे यांच्या हस्ते तिखोल येथील पाझर तलावाचे जलपुजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, मी सध्या तालुक्यात जलपुजनाची स्पर्धा पाहतो आहे. जे पाझर तलाव, लघुपाटबंधारे प्रकल्प, मांडओहळ प्रकल्प स्व. शंकरराव काळे, आबासाहेब निंबाळकर, गोविंदराव आदीक, वसंतराव झावरे यांच्या काळात झाले. स्व. वसंतराव झावरे हे आमदार असताना ५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा ढवळपूरी येथील लघुपाटबंधारे प्रकल्प, २ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणारा भांडगांव लघुपाटबंधारे प्रकल्प, पिंपळगांव जोगा चारी, मांडओहळचे अस्तरीकरण, वडझिरे येथिल शिवडोह तलाव ही तालुक्याला विकासाची दिशा देणारी कामे झाली असल्याचे झावरे म्हणाले.
जलपुजन करण्याबाबत माझा तसा कोणालाही सल्ला नाही. परंतू जलपुजनाची सगळयांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत घाई होताना दिसते आहे. त्यांना माझी विनंती आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू. गेल्या पंधरा, साडेसतरा वर्षात तालुक्यात एकही लघुपाटबंधारे प्रकल्प कुठे दिसला नाही. लोकांनाही दिसला नाही. त्यामुळे आपण एखाद धरण बांधावं. व नंतर त्याचं जलपुजन सर्वांनी करावं. हा नैतिक अधिकाराचा अथवा राजकिय हेव्या दाव्यांचा विषय नाही. परंतू आपण स्वतःच्या कर्तुत्वाने एखादी गोष्ट केली तर ती निश्‍चितच लोक लक्षात ठेवतील असा टोला झावरे यांनी औटी व लंके यांना नाव न घेता लगावला.
यावेळी अरूण ठाणगे, किसन धुमाळ, ढोकेश्‍वर पाणीवाटप संस्थेचे चेअरमन बाळासाहेब झावरे, शिवाजीराव ठाणगे, सरपंच भाऊसाहेब सैद, दिलीपराव पाटोळे, सरपंच गिताराम वाळुंज, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, पोपटराव झावरे, विलास साठे, नागचंद ठाणगे, सोनू मंचरे, लक्ष्मण झावरे, पप्पू ठाणगे, भानुदास ठाणगे, निवृत्ती वाळुंज, भगवान वाळुंज, कोंडीभाऊ वाळुंज, प्रदीप वाळुंज, संदीप वाळुंज, आकाश वाळुंज, शिवाजी वाळुंज, नारायण वाळुंज, अभिषेक वाळुुंज, भानुदास पंढरीनाथ ठाणगे, उत्तम साळवे, महेश ठाणगे, योगेश ठाणगे, प्रतिक ठाणगे, गणेश ठाणगे, सुभाष कावरे आदी उपस्थित होते.
मोठया प्रकल्पांसाठी प्रयत्न
तिखोलच्या तलावाचे जलपुजन झाले आता काळू नं.१ नं २ ढवळपूरी येथील काळू तसेच मांडओहळचेही जलपुजन करण्यात येईल. ही कामे कोणाच्या काळात झाली हे सर्वश्रुत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या माध्यमातून तालुक्यात मोठे लघुपाटबंधारे प्रकल्प, पाझर तलाव, बंधारे यासाठी निधी उपलब्ध केला जाईल.
सुजित झावरे पाटील
माजी उपाध्यक्ष, जि.प.अ.नगर