जॉब लोकसभा सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी…! 'असा' करा ऑनलाईन अर्ज. By Parner News Last updated Sep 24, 2021 0 Share लोकसभा सचिवालयाने सल्लागार आणि अन्य विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कोण अर्ज करू शकतो? अर्ज कसा करावा? अशा सर्व गोष्टी पाहूयात… पद आणि जागा : ● सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) : १ ● सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) : १ ● सिनियर कंटेंट रायटर/मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) : १ ● ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) : १ ● ज्युनियर कंटेंट रायटर (इंग्रजी) : १ ● सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) : ५ ● मॅनेजर (इव्हेंट्रस) : १ शैक्षणिक पात्रता : ● सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर किंवा ज्युनियर कन्सल्टंट) : इंजिनिअरिंग, बिझनेस मॅनेजमेंट, मार्केटिंग, जर्नेलिझम, पब्लिक रिलेशन किंवा कुठल्या अन्य संबंधित फिल्डमधील बॅचलरची डिग्री. ● सिनियर कंटेंट रायटर/ मीडिया अॅनॅलिस्ट (हिंदी) : पत्रकारिता किंवा पॉलिटिकल सायन्स किंवा कायदे किंवा हिंदीमधून पदवी. ● ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी किंवा इंग्रजी) : पदवी ● सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट्स) : कुठल्याही विषयामध्ये बॅचलर डिग्री ● मॅनेजर (इव्हेंट्स) : पदवी, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा व्यवस्थापनामध्ये पदव्युत्तर डिप्लोमा किंवा डिग्री. अर्ज करण्यासाठी http://loksabhadocs.nic.in/ या लोकसभा सचिवालयाचे अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail