Take a fresh look at your lifestyle.

सुजित पाटलांचे मोठे राजकीय वक्तव्य… !

म्हणाले ; आता तर सत्ता आहे

भाळवणी : आपल्याकडे कोणतीही सत्ता नसताना देखील तालुक्यातील विविध विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आता राज्यात सत्ता आली आहे. या सत्तेचा उपयोग जिरवा जिरवीसाठी नव्हे तर विकासकामांसाठी करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पाटील झावरे यांनी सांगितले.
भाळवणी येथील पिराचा मळा येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून साडेआठ लाख रुपये खर्चाच्या अंगणवाडी खोलीचे भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना सुजित झावरे पाटील म्हणाले की, आपण भाळवणी गावच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप दिले आहे. भाळवणी येथील स्थानिक प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. गावच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे.भाळवणी येथील स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी प्राधान्याने प्रयत्न केला आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी व गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध असून खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देणार असल्याचे झावरे -पाटील यांनी सांगितले.
यावेळी सरपंच लिलाबाई रोहोकले, संदीप कपाळे, पाराजी रोहोकले गुरुजी, माजी उपसरपंच सुरेश रोहोकले, जितेंद्र रोहोकले, मारुती रोहोकले, भाऊसाहेब रोहोकले, सूर्यभान रोहोकले, संतोष मोरे, प्रमोद जोशी, छायाबाई रोहोकले, नारायण राऊत, प्रसाद रोहोकले आदी उपस्थित होते.