Take a fresh look at your lifestyle.

आ.निलेश लंके यांचा ‘या’ पुरस्काराने सन्मान !

नवी दिल्लीत झाला गौरव

पारनेर : कोरोना काळात सुरू केलेल्या कोवीड सेंटर मधील आयुर्वेदीक क्षेत्रातील योगदानाबद्दल आमदार निलेश लंके यांना नवी दिल्ली येथे प्रसिद्ध आहार तज्ञ व आयुर्वेदाचार्य डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी जी मुख्य संपादक असलेल्या ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने सन्मानित करण्यात आले.
व्हिएतनाम रेकॉर्डस् संघटनेचे सदस्य असलेल्या देशांबरोबर ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ संस्थेकडून दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  या कार्यक्रमास भारतासह नेपाळ, बांग्लादेश, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रिटन, अमेरीका या देशांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. या आठ देशातील रेकॉर्ड धारकांना ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये सन्मानित होण्याची संधी मिळते.
सन्मानानंतर बोलताना आ. लंके म्हणाले की, 2021 मध्ये कोवीड काळात सुरू केलेल्या कोवीड सेंटरमध्ये डॉ. बिस्वरूपरॉय चौधरी जी व NICE टीम (Network of Influenza Care Expert) यांच्या सहकार्याने मी देशातील पहिले नॅचरोपॅथी कोविड सेंटर सुरू केले होते. यामध्ये कोणत्याही औषधांशिवाय कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांवर यशस्वी नैसर्गिक उपचार केले होते. माझ्या या सन्मानाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्, व्हीएतनाम रेकॉर्डस् संघटनेचा व त्यांच्या सदस्य राष्ट्रांच्या बुक ऑफ रेकॉर्डस् संस्थाचा मी आभारी आहे असेही आ. लंके म्हणाले.