Take a fresh look at your lifestyle.

आनंदाची बातमी : नगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 3 कोटी रूपये !

शिंदे सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत दिली जाते. सन 2022 मध्ये राज्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी 8 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून 3 हजार 345 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यासंदर्भात एक महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.नगर जिल्ह्यातील 21 हजार 410 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
▪️किती मिळणार मदत ?
या शासन निर्णयाअंतर्गत 3 हजार 456 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तर यामध्ये जिरायत शेतीच्या नुकसानीसाठी 13 हजार 500 रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत. बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. तर बहुवार्षिक पिकाच्या मदतीसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत वितरीत केले जाणार आहे.
▪️बाधित जिल्ह्यांना मदतीचे वाटप
• नाशिक विभागासाठी 36 कोटी 95 लाख रुपये,
• पुणे विभागासाठी 44 कोटी 38 लाख रुपये,
• अमरावती विभागासाठी 1196 कोटी रुपये,
• औरंगाबाद विभागासाठी 1008 कोटी
• नागपूर विभाग 1156 कोटी तर
• कोकण विभाग 2.64 कोटी
• याप्रमाणे एकूण 3345 कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.
▪️कोणत्या जिल्ह्यांना मिळणार मदत?
जालना जिल्ह्यातील 6,898 शेतकऱ्यांसाठी 3.71 कोटी एवढी मदत वितरित केली जाणार आहे. परभणी जिल्ह्यातील 1,557 शेतकऱ्यांसाठी एक कोटी 60 लाख रुपये. हिंगोली जिल्ह्यांमध्ये 12,370 शेतकऱ्यांसाठी 157 कोटी 4 लाख रुपये. नांदेड जिल्ह्यामधील सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांसाठी 717 कोटी 88 लाख. लातूर जिल्ह्यामधील 49 हजार 160 शेतकऱ्यांसाठी 30 37 कोटी 30 लाख रुपये, तर उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यामध्ये 75 हजार 739 शेतकऱ्यांसाठी 90 कोटी 74 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. एकूण औरंगाबाद विभागासाठी 10 लाख 9 हजार 270 शेतकऱ्यांसाठी 1 हजार 8 कोटी 30 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी 18,467 शेतकरी 11 कोटी 24 लाख रुपये. धुळे जिल्ह्यामधील 4,497 शेतकऱ्यांसाठी तीन कोटी 39 लाख रुपये. नंदुरबार जिल्ह्यामधील 877 शेतकऱ्यांसाठी 35 लाख रुपये, तर जळगाव जिल्ह्यामधील 11,424 शेतकऱ्यांसाठी 19.6 कोटी रुपये अहमदनगर जिल्ह्यासाठी 21,410 शेतकऱ्यांसाठी दोन कोटी 91 लाख एवढी मदत वितरित केली जाणार आहे.अशाप्रकारे इतर जिल्हे देखील पात्र झाले आहेत त्यांनाही या मदतीचे वितरण करण्यात येणार