Take a fresh look at your lifestyle.

तालुकाप्रमुख विकास रोहोकलेंची कृषी मंत्र्यांकडे मागणी

माझ्या दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या

पारनेर : प्रतिनिधी
पारनेर तालुका हा सततचा दुष्काळी तालुका आहे.येथील शेतकऱ्यांचे भवितव्य हे पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे या तालुक्यातील शेती ही अशाश्वत असल्याने यापुढील काळात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी मंगळवारी मुंबई येथे कृषीमंत्री सत्तार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तालुक्यातील शेती व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. यावेळी कृषी मंत्री सत्तार यांच्याशी बोलताना रोहोकले म्हणाले की, पारनेर तालुका हा सततचा अवर्षण प्रवणग्रस्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय हा पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे.या तालुक्यातील कांदा हे मुख्य पीक आहे परंतु सध्या कांद्याचे बाजारभावही घसरल्याने शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहोकले यांनी कृषीमंत्री सत्तार यांच्याकडे केली.
यावर बोलताना कृषीमंत्री सत्तार म्हणाले की पारनेर तालुका हा सततचा दुष्काळी तालुका आहे. सर्वसामान्य जनतेबरोबरच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका शिंदे -फडणवीस सरकारची असून कृषी विभागाच्या माध्यमातून या तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे कृषीमंत्री सत्तार यांनी सांगितले या प्रसंगी रोहोकले यांच्या समवेत पारनेर तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.