Take a fresh look at your lifestyle.

शहाजी बापू पाटील आज पारनेर दौऱ्यावर

शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले करणार स्वागत

पारनेर : काय झाडी… काय डोंगर.. काय हाटेल या डायलॉगमुळे प्रसिद्धी झोतात आलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील हे आज ( सोमवारी) पारनेर तालुका दौऱ्यावर येणार असून त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती विकास रोहोकले यांनी ‘ पारनेर दर्शन’शी बोलताना दिली.
राज्यातील सत्ता संघर्षानंतर सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिंदे गटाची साथ केली. आसाम राज्यातील गुवाहाटी येथील हॉटेल मधला शहाजी बापूंचा डायलॉग देशात फेमस झाला आहे. बापूंच्या या प्रसिध्दीमुळेच तालुक्यात कर्जुले हर्या येथे रविवारी नव्याने शुभारंभ होणाऱ्या हॉटेल गुवाहाटीचे उद्घाटन शहाजी बापू करणार होते. मात्र काही कारणाने रविवारी ते येवू न शकल्याने ते सोमवारी या हॉटेलला भेट देणार आहेत
दरम्यान, पारनेर तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनीही ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला आहे. सोमवारच्या शहाजी बापूंच्या दौऱ्याचे नियोजन रोहोकले यांच्याकडेच आहे. या दौऱ्यात पाटील आज काय बोलणार या विषयी पारनेरकरांना उत्सुकता आहे.