Take a fresh look at your lifestyle.

विजयराव औटी पुन्हा अॅक्टीव मोडवर !

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण दौरा

पनवेल : नाना करंजुले
पारनेर – नगरचे माजी आमदार तथा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांनी प्रदीर्घ कालावधीनंतर शनिवारी कामोठे दौरा करून तेथील गणपतींचे दर्शन घेतले. त्याचबरोबर कामोठे स्थित पारनेरकरांच्या गाठीभेटी घेतल्या. तालुक्यात होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औटी यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.
पारनेर तालुक्यातील अनेक कुटुंब नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक झाले आहेत. कामोठे वसाहतीत हे प्रमाण सर्वाधिक असून या कॉलनीला मिनी पारनेर चे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान कामोठे करांची भूमिका तालुक्याच्या राजकारणाला दिशादर्शक असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. कामोठे वसाहतीमध्ये शिवसेना आणि माजी आमदार विजयराव औटी यांना मानणारा वर्ग सुद्धा आहे. त्यामुळे सहाजिकच हे सर्वजण त्यांच्या संपर्कात आहेत. दरम्यान मध्यंतरीच्या काळामध्ये औटी राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. पारनेर तालुक्यामधील शिवसेना एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याचे नेतृत्व विजयराव औटी करीत आहेत. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी करिता धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेना सज्ज झाली आहे. दरम्यान औटी यांनीसुद्धा मुंबईस्थित पारनेर करांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी त्यांनी कामोठे येथे येऊन गणरायांचे दर्शन घेतले. त्याचबरोबर याठिकाणी राहणाऱ्या पारनेर करांची विचारपूस केली.
पुष्पसागर सोसायटी मध्ये गणपती आरती सुद्धा त्यांनी घेतली. यावेळी शिवसेनेचे अहमदनगर उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले उपस्थित होते. त्यांनीही गणरायांचे दर्शन घेतले. सोसायटीचे अध्यक्ष मंजाराम शेठ दातीर, सचिव कुंडलिक वाफारे, पळसपूरचे उपसरपंच किसन डोंगरे, शिवसेना शाखा प्रमुख ज्ञानदेव आहेर, भागाजी दाते,राहुल बेलकर ,बन्सीशेठ पागिरे, शिवसेना शाखा प्रमुख अमोल मुंढे ,दत्तात्रेय बेलकर ,बाबाजी बेलकर, योगेश शेठ हुलावळे ,संजय शेठ चौधरी ,संदिप झिंझाड़, दत्ता भाडळे, कामोठे उपशाखा प्रमुख अविनाश खरात, साहेबराव झावरे आणि शिवसैनिक उपस्थित होते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष विजयराव औटी यांचा आणि कामोठेस्थित पारनेरकरांचा संपर्क हा सुरुवातीपासून आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करणाऱ्या या नेतृत्वाने मुंबईतील पारनेरकरांनाही कधीच अंतर दिले नाही. शनिवारी त्यांनी गणेश मंडळाला सदिच्छा भेट दिली आणि गणरायांचे दर्शन घेतले. ही राजकीय भेट नव्हती त्याचबरोबर निवडणुकांची पार्श्वभूमी सुद्धा नव्हती मात्र त्यांच्या भेटीमुळे कामोठे येथील पारनेरकरांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
कुंडलिक वाफारे
ज्येष्ठ शिवसैनिक