Take a fresh look at your lifestyle.

शहाजी बापू हातभट्टीचा तांब्या मारून बोलतात का ?

शिवसेनेच्या 'या' नेत्याने केला सवाल

सोलापुर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांना मी सांगोल्यात दोन बंगले घेऊन देईन, अशी टिप्पणी शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती. याला शिवसेनेचे नेते शरद कोळी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शहाजी बापूकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत. एवढचं नव्हे तर हातभट्टी दारू प्यायल्यानंतर शहाजी पाटील त्याचं पैसेही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजी पाटील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना घर काय बांधून देणार, असा खोचक सवाल शरद कोळी यांनी शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील यांना केला आहे.
शहाजी पाटील संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमकं तेच कळत नाही, अशी घणाघाती टिका करत आमदार होण्यासाठी शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते. याचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे. शहाजी पाटलांनी वायफळ बडबड बंद करावी. अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलनं उत्तर देऊ, असा इशारा शरद कोळी यांनी दिला आहे.
दरम्यान, शिवसेनेने सांगोल्यात लक्ष घालत आहे असं विचारलं असता शहाजी बापू पाटील यांनी मला पाडणार का? पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? मी सात ते आठवेळा धडाधडा पडलो आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामं करावीत. त्यासाठी मी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, असे वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी केले होते.