Take a fresh look at your lifestyle.

नवे समीकरण : ‘या’ पक्षांची होणार युती ?

राज्याचे राजकारण वेगळ्या वळणावर !

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यावेळी ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी भाजप मनसेच्या युतीची शक्यता आहे.
▪️मुख्यमंत्र्यांची भेट
राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटी वाढलेल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही काल राज ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी शिवतीर्थावर जात गणपतीचे दर्शन घेतले.
▪️भाजप-मनसे युती होणार?
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगवा केला. भाजपने शिंदेगटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपची सलगी वाढताना दिसतेय. अश्यात आता मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या भेटीगाठी पाहता मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसे-भाजप युती झाली तर वावगं वाटायला नको.
▪️युती झाल्यास काय?
मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अश्यात मनसे आणि भाजपची युती झाली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करणारा मतदारवर्ग आपली मतं युतीच्या पारड्यात टाकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचा फायदा होईल तर शिवसेनेला आपल्या बालेकिल्ल्यात फटका बसण्याची शक्यता आहे.