Take a fresh look at your lifestyle.

मृत्युंजयदुत सिद्धांत आंधळे यांच्या सतर्कतेमुळे बचावले 6 जवानांचे प्राण

कामरगाव घाटात लष्करी वाहनाचा अपघात

कामरगाव : नगर -पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून मंगळवारी सायंकाळी 4 च्या सुमारास कामरगाव घाटात लष्कराचे जवान असलेले वाहन पलटी झाले. प्रसंगी मृत्युंजय दुत सिद्धांत आंधळे हे त्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. व स्थानिक लोकांच्या मदतीने जवानांना गाडीतून बाहेर काढून तत्काळ डॉ. बलराज पाटील यांची रुग्णवाहिका बोलवून जवानांना अ.नगर येथील लष्करी दवाखान्यात भरती केले.
या संदर्भातील माहिती त्यांनी महामार्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरी यांना समजताच स्वतः ते घटनास्थळी दाखल होऊन वाहतून कोंडी होऊ दिली नाही. व लष्करी वाहन क्रेनच्या साहाय्याने नगर तालुका पोलिस स्टेशन येथे नेण्यात आले.
नगर – पुणे महामार्गावर सातत्याने अपघात हे होत आहेत. हल्ली अपघाताचे प्रमाण चास ते कामरगाव शिवारात वाढलेले दिसून येत आहे. शासनाला आमची विनंती आहे की या भागात एक ट्रॉमा सेंटर झाले तर अपघातग्रस्थाना तात्काळ मदत होईल व लोकांचे प्राण वाचतील.
– सिद्धांत सुभाष आंधळे
(अध्यक्ष आ.निलेश लंके प्रतिष्ठान)