Take a fresh look at your lifestyle.

तर राज्यात मध्यावधी निवडणूका अटळ ?

'या' प्रदेशाध्यक्षांचे मोठे भाकीत

बुलढाणा : महाराष्ट्रात मोठा सत्तासंघर्ष झाल्यानंतर यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने निलंबित केल्यास शिंदे -फडणवीस सरकार कोसळेल आणि त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी मध्यावधी निवडणुकीची तयारी करत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री जयंत पाटील हे बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे सरकार आणि राज्यपालांवर टीका केली.शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला.
“भारतात लोकशाही टिकवण्यासाठी पक्षांतर बंदीचा कायदा आहे, त्याची योग्य अंमलबजावणी झाली, तर कोणी कुठून ही निवडून या. आम्ही त्यांना गोळा करू म्हणणाऱ्यांना आळा बसण्यासाठी सुप्रीम कोर्टाने योग्य निर्णय दिला पाहिजे.” अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.