Take a fresh look at your lifestyle.

पारनेरात भाजपा,सेनेची यूती अभेद्य राहणार !

'या' पदाधिकाऱ्यांनी केला विश्वास व्यक्त

भाळवणी : शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची या गटाच्या तालुकाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा व तालुका भाजपाच्या वतीने त्यांचा भाळवणी येथे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याप्रमाणेच तालुक्यातही शिवसेनेच्या शिंदे गट व भाजपाची युती अभेद्य राहील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग,सुभाष दुधाडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित रोहोकले,तालुकाध्यक्ष वसंत चेडे,हिवरे झरे येथील बाळासाहेब आनंदकर, कार्यालय प्रमुख बाळासाहेब पोटघन, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष पोपटराव लोंढे, सरचिटणीस कुशाहरी भांड, किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आमले, भटक्या विमुक्त आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोहर पारखे, सैनिक बँकेचे संचालक अरुण रोहोकले, बबनराव डावखर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले म्हणाले की, तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा व अनेक वर्ष रखडलेले प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे यासाठीच आपण शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला असून हे प्रश्न सोडविण्याचे आपणास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. लवकरच त्यांच्या उपस्थितीत भाळवणी येथे मेळावा होणार असल्याचे सांगत राज्यात शिवसेनेचा शिंदे गट व भाजपा यांचे एकत्रित सरकार आहे त्यामुळेच आगामी काळात तालुक्यातही विकासाच्या मुद्द्यावर ही युती कायम राहणार असल्याचे रोहोकले यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.