Take a fresh look at your lifestyle.

नवे तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे म्हणतात…

शिवसेनेशी कधीही गद्दारी करणार नाही !

पारनेर : ठाकरे कुटूंबाशी तसेच शिवसेनेशी आपण कधीही गद्दारी करणार नसून शिवसेना व जनता हीच माझी निष्ठा असल्याचे शिवसेनेचे नवनिर्वाचित तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले.
शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांचा पिंपरीजलसेन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आाला. सत्काराला उत्तर देताना डॉ. पठारे यांनी मी निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी आपली निवड झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, माझ्या नसानसात शिवसेना भिनलेली आहे. आपल्याच पक्षातील लोकांनी पक्षाशी गद्दारी केली. मी गद्दारांमधील नसून शिवसेनेच्या चांगल्या व वाईट या दोन्ही काळात पक्षासोबत राहणारा निष्ठावान शिवसैनिक आहे. शिवसेनेमध्ये आजवर निष्ठेने केलेल्या कामाची पावती म्हणून शिवसेनापक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्यामुळे मला तालुकाप्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळाली.
पदाच्या माध्यमातून तालुक्यात पक्षवाढीसाठी विशेष अभियान हाती घेण्यात येणार असून सर्व शिवसैनिकांना बाळ देण्यात येईल. येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेवर भगवा फडकविण्याचे स्वप्न आपणास साकार करायचे आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये विकास निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पठारे यांनी सांगितले.
आश्रफ शेख, भाऊसाहेब पानमंद, ज्ञानदेव कदम, दिलीप बोरूडे, पत्रकार चंद्रकांत कदम यांचीही यावेळी भाषणे झाली.
यावेळी सरपंच सुरेश काळे, उपसरपंच भाऊसाहेब पानमंद, दगडू थोरात, दत्तात्रय थोरात, तालुका संघटक अमोल गाजरे, शाखाप्रमुख जगदीश सोनवणे, सोशल मिडिया प्रमुख आदीनाथ कदम,बाळासाहेब वाढवणे, आश्रफ शेख, कोंंडीभाऊ बोरूडे, ज्ञानदेव कदम, बाबाजी वाढवणे, शिवाजी बोरूडे, विकास वाढवणे, अक्षय कदम, भिवाजी वाढवणे, अक्षय बोरूडे, रंगनाथ वाढवणे, संतोष थोरात, हुसेन शेख, गुलाब थोरात, सचिन काळे, रेवजी कदम, दिलीप बोरूडे, दिनेश शेळके, रोहन कदम यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.