Take a fresh look at your lifestyle.

‘या’ शिक्षकांचे पगार होणार बंद

जाणून घ्या काय आहे कारण

नगर : टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेले ७ हजार ८७४ शिक्षकांचा ऑगस्टपासून पगार बंद करण्यात आला असल्याची माहिती शासनाकडून मिळाली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील १३ शिक्षकांचे वेतन थांबवले आहे. याशिवाय संबंधित शिक्षकांचे शालार्थ आयडी गाेठवण्याच्या सूचना शिक्षक संचालकांनी दिल्या आहे.
सन २०१९ मध्ये टीईटी परीक्षेत ७८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे पुणे सायबर पोलिसांना निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरविले गेले. टीईटी प्रमाणपत्र पडताळणीत अहमदनगर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील दहा व माध्यमिक शाळेतील तीन असे एकूण १३ शिक्षक अपात्र आढळले आहे.
खासगी प्राथमिक मधील दहापैकी पाच शिक्षक अनुदानित, तर पाच शिक्षक विनाअनुदानित शाळांचे आहेत. याशिवाय माध्यमिकचे तीन शिक्षक अनुदानित शाळांचे असून त्यांचे वेतन थांबवण्यात आले आहे. यादीतील शिक्षक जिल्हा परिषद अथवा खासगी शाळेतील असल्यास त्यांचे शालार्थ आयडी पुढील आदेशपर्यंत गाेठवण्यात यावे, असे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहे.