Take a fresh look at your lifestyle.

पारनेरच्या ‘या’ पदाधिकाऱ्यावर पुन्हा दुसरा गुन्हा दाखल

तब्बल 'इतक्या' वर्षानंतर फिर्याद

पारनेर : पारनेरच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्विकारल्यानंतर काहीच दिवसात नगराध्यक्ष विजय औटी त्यांच्याच पाठोपाठ नगरपंचायतीचे सभापती नितीन आडसूळ, नगरसेवक युवराज पठारे, शुभम देशमुख यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. हे प्रकरण मिटते ना मिटते तेच नगराध्यक्ष विजय औटी यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला आहे.
पारनेरचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी व इतर सात जणांविरोधात बनावट कागदपत्रे तयार करून जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०१४ मध्ये या जमीनीची विक्री झाल्यानंतर तब्बल आठ वर्षानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रकांत पांडूरंग पाटील ( रा. अंबरनाथ ईस्ट) यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे. विजय सदाशिव औटी, नंदकुमार सदाशिव औटी, सुरजकुमार भागाजी नवले, योगेश नारायण झंजाड यांच्यासह इतर तिघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.२३ मे २०१४ रोजी पारनेरमधील गट नंबर ३४४० मधील दिड एकर जमीन चेतन दुर्गादास मेहरा, धमेंद्र गुलाचंद सिराज व निलकमल वजीरलाला सिराज यांच्या मालकीची साठ गुंठे जमीन त्यांच्या ऐवजी तोतया इसमांना उभे करून, बनावट आधार कार्ड आणि दस्तऐवज तयार करून ही जमीन खरेदी करण्यात आली. ती नंदकुमार औटी यांच्या नावावर करण्यात आली. पुढे हीच जमीन योगेश झंजाड यास विकण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.