Take a fresh look at your lifestyle.

दाते सरांनी कोणावर साधला निशाणा ?

म्हणाले... करायचे थोडे अन् सांगायचे मोठे !

कर्जुले हर्या : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व कृषी समितीच्या सभापतीपदाची संधी मिळाल्यानंतर या पदाच्या माध्यमातून विकास कामांच्या बाबतीत तालुक्याला झुकते माप दिल्याचे जि.प. चे माजी सदस्य काशिनाथ दाते यांनी सांगितले.
वाफारेवाडी, कर्जुलेहर्या येथे आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवापुर्ती कार्यक्रमाचे हनुमान ग्रामविकास ट्रस्ट व वाफारेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी दाते हे बोलत होते. सरपंच संजीवनी आंधळे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सुनिता मुळे, माजी सरपंच साहेबरावदादा वाफारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना दाते म्हणाले, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांचा पंधरा वर्षांचा कालखंड तसेच माझी जिल्हा परिषदेची पाच वर्षे या कालावधीत कर्जुले हर्या गावामध्ये कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे सर्व विकास कामे मार्गी लावली आहेत.जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तब्बल पाच कोटी रूपयांची कामे मार्गी लागली. जिल्हा परिषदेचा सभापती म्हणून काम करताना कर्जुले हर्या बरोबरच तालुक्यातील प्रत्येक गावाला झुकते माप देण्याचा प्रयत्न केला. कोण काय करते याचा विचार न करता काम करीत रहायचे हे माझे नेहमीची धोरण असते. पालकांनी तरूण पिढीला घडविण्यासाठी, सुसंस्कृत बनविण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आवश्यक आहे. तरूणांचा भ्रमनिरास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तरूणांनी चांगला मार्ग स्विकारला पाहिजे.
मी चाळीस वर्षे तालुक्याच्या राजकारणात काम करतो आहे. करायचे थोडे आणि सांगायचे मोठे असे काहींचे असते. हे देखील तपासून पहा असे आवाहन दाते यांनी केले. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून झालेल्या कामाचे दाते यांनी कौतुक केले.
यावेळी गणपत वाफारे, संदेश कारंडे, युवराज वाफारे, बबन वाफारे, तुळशीराम हुलावळे, लहू वाफारे, मारूती वाफारे, बाळासाहेब वाफारे, मच्छिंद्र वाफारे, सुरेश वाफारे, विठ्ठल वाफारे, ज्ञानदेव वाफारे, शांताराम मुळे, लालू मुळे, मुंडे महाराज, दिनकर वाफारे, पांडूरंग वाफारे, सुरेश वाफारे, बोरूडे गुरूजी, रविंद्र वाफारे, सुगंधाबाई वाफारे, गिता वाफारे, मनिषा वाफारे, हिराबाई वाफारे, रेणूबाई वाफारे, ज्योती वाफारे, गणेश शिंदे, भानुदास ठाणगे आदी उपस्थित होते. ज्ञानदेव साहेबराव वाफरे यांनी सुत्रसंचलन तर सरपंच संजीवनी मुळे यांनी आभार मानले.